शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | |
---|---|
पक्षाध्यक्ष | उद्धव बाळासाहेब ठाकरे |
सचिव | अनिल देसाई, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर |
लोकसभेमधील पक्षनेता | अरविंद सावंत |
राज्यसभेमधील पक्षनेता | संजय राऊत |
स्थापना | 10 ऑक्टोबर 2022 |
संस्थापक | उद्धव ठाकरे |
विभाजित | शिवसेना |
युती | महाविकास आघाडी |
लोकसभेमधील जागा | ०९ / ५४३
|
राज्यसभेमधील जागा | ०३ / २४५
|
विधानसभेमधील जागा | १६ / २८८
|
राजकीय तत्त्वे | महाराष्ट्रवाद,ज्वलंत हिंदुत्व[१][२] हिंदू राष्ट्रवाद[३] |
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)[४][५][६] हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष असून तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये स्थापन झालेला आहे. या पक्षाला निवडणूक आयोगाने मुख्य शिवसेनेपासून वेगळे असे नवे चिन्ह दिले आहे. इ.स. २०२२ च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा परिणाम म्हणून मुख्य शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. त्यामुळे तात्पुरता मुख्य पक्ष आणि चिन्ह गोठवून दोन स्वतंत्र पक्ष निर्माण झाले आहेत, पैकी दुसरा पक्ष बाळासाहेबांची शिवसेना हा होय.
पक्षनेते
संपादनअ. क्र. | नाव | छायाचित्र | पदनाम |
---|---|---|---|
१ | उद्धव ठाकरे | संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री | |
२ | विनायक राऊत | नेते, लोकसभा | |
३ | संजय राऊत | नेते, राज्यसभा | |
४ | अजय चौधरी | नेते, महाराष्ट्र विधानसभा | |
५ | अंबादास दानवे | विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद | |
६ | आदित्य ठाकरे | माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र सरकार |
राज्यसभा खासदार
संपादनअ. क्र. | नाव | नेमणुकीची तारीख | सेवानिवृत्तीची तारीख |
---|---|---|---|
१ | संजय राऊत | ०५ जुलै २०२२ | ०४ जुलै २०२८ |
२ | प्रियंका चतुर्वेदी | ०३ एप्रिल २०२० | ०२ एप्रिल २०२६ |
३ | अनिल देसाई | ०३ एप्रिल २०१८ | ०२ एप्रिल २०२४ |
चिन्ह वाद
संपादनशिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नवीन नांव आणि निवडणूक चिन्ह म्हणून मशाल (Flaming torch) दिले होते, ज्यावर समता पक्षच्या शीर्ष नेतृत्वाने आपले मूळ चिन्ह असल्याचा दावा केला आहे. समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी मशाल चिन्हासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु तिथे याचिका फेटाळली गेली. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, परंतु धगधगती मशाल हे चिन्ह ठाकरेंनाच मिळाले.
संदर्भ
संपादन- ^ "Uddhav Thackeray defines Shiv Sena's Secular Hindutva". 9 June 2022.
- ^ "Uddhav Thackeray defines Shiv Sena's Secular Hindutva". 9 June 2022.
- ^ "Uddhav Thackeray defines Shiv Sena's Secular Hindutva". 9 June 2022.
- ^ "Team Eknath Shinde Now 'Balasahebanchi Shiv Sena', 'Mashaal' Poll Symbol for Uddhav Camp".
- ^ "Thackeray-led Sena gets 'mashaal' as election symbol; Shinde camp asked to give fresh list".
- ^ "शिंदे-उद्धव गुटों को नए नाम अलॉट, निशान एक को: एकनाथ को गदा देने से Ec का इनकार; ठाकरे को मशाल सिंबल मिला". 10 October 2022.