अरविंद सावंत

भारतीय राजकारणी

अरविंद गणपतराव सावंत (३१ डिसेंबर, इ.स. १९५१ - ) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे सदस्य असलेल्या सावंत ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार मिलिंद देवडा ह्यांचा १ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. १७ व्या लोकसभेवर निवडून मंत्रीपदी राहिले, अन् युतीच्या तुटीनंतर राजीनामा दिला. १८ व्या लोकसभा त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जिंकली. त्यानंतर लोकसभेत पक्षाचे गटनेते झाले.

हे सुद्धा पहा

संपादन