विधानसभा

राज्यातील कायदे मंडळाचा कनिष्ठ गृह

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार), आंध्र प्रदेशतेलंगणा या ६ घटकराज्यांत द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे. बाकीच्या सर्व घटकराज्यांत एकगृह कायदेमंडळ पद्धती असून तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे. भारतातील विधानसभा हे भारतीय लोकसभा सारखेच काम करणार असे घटनाकारांचे मत होते. घटनेच्या170 व्या कलमानुसार प्रत्येक राज्यात विधानसभा हे सभागृह अस्तित्वात आहे. विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ असलेले जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असतात मात्र लहान राज्याच्या विधानसभा अपवाद आहेत. उदा. सिक्किम विधानसभा 32 सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत. विधानसभेच्या मतदारसंघांपैकी काही जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असतात. उदा. महाराष्ट्रात 47 जागा राखीव आहेत. विधानसभेचा मतदारसंघ कमीत कमी 75000 ते 350000 मतदारांचा मिळून बनलेला असतो. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कायद्यात पात्रता निश्चत केलेल्या आहेत.