शिमला

हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी

श्यामला(श्यामला) भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी व शिमला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

  ?श्यामला

हिमाचल प्रदेश • भारत
—  शहर  —
श्यामला
श्यामला
श्यामला
Map

३१° ०६′ १२″ N, ७७° १०′ २०″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
समुद्री किनारा
२५ चौ. किमी
• २,१३० मी
• ४८ किमी
हवामान
वर्षाव
Am (Köppen)
• २,७४३ मिमी (१०८.० इंच)
जिल्हा शिमला
लोकसंख्या
घनता
१,६३,००० (२००१)
• १२०/किमी
महापौर सोहन लाल
आयुक्त शेखर गुप्ता
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 171 0xx
• +०१७७
• INSHI
• HP-03, HP-51
संकेतस्थळ: श्यामला मनपा संकेतस्थळ


१८६४ साली ब्रिटिशांनी श्यामला हिला उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केली. हे एक प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटनस्थळ असून 'पर्वतांची राणी' म्हणून उल्लेखले जाते. ब्रिटिशांच्या आधी शिमला नेपाळ राष्ट्राच्या अधीन होते. ब्रिटिशानी नेपाळच्या राजाबरोबर झालेल्या युद्धात नेपाळला हरवून श्यामला काबीज केले. वर्ष १९४७ ते १९५३ पर्यंत श्यामला पूर्व पंजाबचे मुख्यालय राहिले. १९६६ मध्ये पंजाब आणि हरियाणाच्या विभाजनानंतर श्यामला हिमाचल प्रदेशची राजधानी म्हणून विकसित झाले.

इतिहास

संपादन

शिमल्याचा शोध इंग्रजांनी सन १८१९ साली लावला. चार्ल्स केनेडीने येथे सर्वप्रथम उन्हाळ्यासाठी वास्तव्यासाठीचे ठिकाण म्हणुन बनविले. लवकरच शिमला लॉर्ड विल्यम बेंटिकच्या नजरेत आले, जे १८२८ पासून १८३५ पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल होते. १८ व्या शतकात शिमला शहर घनदाट जंगलाने व्यापलेला होता. शिमला नावाच्या आधी काली हिंदू देवी आणि श्यामला देवी या नावाचा भाग होता.[१]

१८०६ मध्ये नेपाळचे भीमसेन थापा यांनी शिमला क्षेत्रावर हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले. ३० ऑगस्ट १८१७ मध्ये जेरार्ड भाईंनी या क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते; त्यांनी शिमल्याला "एक लहान आकाराचा गाव" असे म्हटले होते.

भूगोल

संपादन

शिमला पश्चिम हिमालयाच्या उत्तरेला आहे.शिमला २३९७.५९ मीटर उंचीवरील एका टोकावर पसरलेले आहे. शिमला हिमालयाच्या आग्नेय भागातील ३१.६१ अंश उत्तर व ७७.१० अंश पूर्व या अक्षांश-रेखांशावर आहे. ते समुद्रसपाटीपासून सरासरी २,२०६ मीटर (७,२३८ फूट) उंचीवर आहे व ते सात टेकड्यांबरोबर एक किल्ल्यावर पसरले आहे. शिमलामधील सर्वात उंच ठिकाण म्हणजे जाखू टेकडी. ही २,४५४ मीटर (८,५०१ फूट) उंचीवर आहे.

शिमला योजना क्षेत्रातील ग्रीन बेल्ट ४१४ हेक्टर (१,२०२० एकर) पसरली आहे. शहरात मुख्य वन पाइन, देवदार, ओक आणि रोडोडेंड्रॉन आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरणीय घट झाली आहे, परिणामी शिमला पर्यावरणीय स्थान म्हणून गमावत आहे. निसर्गसौंदर्य आणि मनोहारी दृश्य याने सम्रृद्ध असलेले हे शहर आहे.

संस्कृति

संपादन

येथे वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. दर वर्षी पीक-सीझनमध्ये शिमला समर फेस्टिवल आयोजित केला जातो.

पर्यटन

संपादन

हिमाचल प्रदेशची राजधानी आणि ब्रिटिशकालीन उन्हाळी राजधानी असलेले शिमला एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे.

शिमला साधारण ७२३८ फूट उंचीवर असून, येथील वातावरण वर्षभर थंड असते. येथून हिमालय पर्वतराजीचे मनोहारी दृश्य दिसते.


पर्यटकांसाठी आकर्षणे

शहराच्या मधोमध एक मोठी मैदानासारखी जागा आहे, येथून पर्वतरांगा दिसू शकतात. येथे शिमल्याची ओळख बनलेले आणि न्यू-गॉथिक वास्तुकलेचे उदाहरण असलेले क्राइस्ट चर्च तसेच न्यू-ट्यूडर पुस्तकालय पाहण्याजोगे आहे.

शिमल्याचे मुख्य व्यापारी केंद्र. गेइटी थिएटर हे प्राचीन ब्रिटिश थिएटरचेच एक रूप आहे. आता सांस्कृतिक दळणवळणाचे मुख्य केंद्र आहे. कार्ट रोडहून मॉलकरिता हिमाचल प्रदेश पर्यटन विभागाच्या लिफ्टने/रोपवेने सुद्धा जाता येते. रिजच्या जवळील लक्कड बाजार हा लाकडी वस्तू आणि स्मृती चिन्हांसाठी प्रसिद्ध आहे.

कालीबारी मंदिर

संपादन

हे मंदिर स्कँडल पॉइंटपासून जनरल पोस्ट ऑफिसकडे जाताना जवळच आहे.

शिमल्यातील २४५५ मीटर उंचीवर असलेले सर्वात उंच ठिकाण. येथून शहराचे सुंदर दृश्य दिसते. येथे हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे.

राज्य संग्रहालय

संपादन

हिमाचल प्रदेशची ऐतिहासिक वास्तुकला आणि चित्रांचा संग्रह. संग्रहालय सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालू असते. सोमवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी ते बंद असते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी

संपादन

हे ब्रिटिशकालीन भवन पूर्वी भारताच्या व्हाॅईसरायचे राहण्याचे ठिकाण होते.

प्रॉस्पेट हिल

संपादन

(5 कि.मी.) 2155 मी. : शिमला - बिलासपूर मार्गावरील हे ठिकाण बालुगंज पासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे कामना देवीचे मंदिर आहे. येथून पर्वतरांगेचे सुंदर दृश्य दिसते.

समर हिल

संपादन

(7 कि.मी.) 1983 मी. : शिमला - कालका मार्गावरील एक सुंदर ठिकाण आहे. येथील वातावरण शांत असून रस्ते झाडांनी व्यापले आहेत. आपल्या शिमला दौऱ्यादरम्यान महात्मा गांधी राजकुमारी अमृत कौर यांच्या जॉर्जियन हाऊसमध्ये राहिले होते. येथे हिमाचल प्रदेश विश्वविद्यालय आहे.

चाडविक धबधबा

संपादन

(7 कि.मी.) 1586 मी. : दाट जंगलातील हे स्थान समर हिल चौकापासून ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

संकट मोचन

संपादन

(7 कि.मी.) 1975 मी. : शिमला कालका मार्गावरील (रा. मा. २२) हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर.

तारादेवी

संपादन

(11 कि.मी.) 1851 मी. : शिमला कालका मार्गावरील (रा. मा. २२) प्रसिद्ध मंदिर.

शिक्षण

संपादन

शहरामध्ये १४ अंगणवाड्या आणि ६३ प्राथमिक विद्यालये आहेत तसेच बऱ्याच ब्रिटिशकालीन शाळा आहेत. शिमल्यात इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि दंत महाविद्यालय आहे.

दळणवळण

संपादन

शिमला बसने हिमाचल प्रदेशमधील इतर शहरांशी तसेच दिल्ली, चंदीगडला जोडले गेले आहे.

रेल्वे

संपादन

शिमला नॅरोगेज मार्गाने कालकाशी जोडले आहे जे भारतातील सर्व मुख्य शहरांशी जोडले आहे. कालका ते शिमला ही टाॅय ट्रेन युनेस्कोच्या हेरिटेज स्थळांच्या यादीत आहे.

विमानतळ

संपादन

शिमला विमानतळ जुब्बारहत्ती (१२ कि. मी.) येथे असून, दिल्लीला विमानसेवेने जोडला आहे.

बाह्य दुवे

संपादन

शिमलाच्या प्रेक्षणीय स्थळाची बातमी Archived 2016-08-07 at the Wayback Machine.

कालका ते शिमला ट्रेन माहिती

शिमला पर्यटन स्थळे Archived 2020-10-24 at the Wayback Machine.

  1. ^ Kaushal, Richa; Thakur, DS; Kumar, Arjun (2017-07-31). "GROWTH AND CONTRIBUTION OF HORTICULTURE OF HIMACHAL PRADESH: A CASE STUDY OF KOTGARH VALLEY OF SHIMLA DISTRICT, HIMACHAL PRADESH". International Journal of Advanced Research. 5 (7): 393–400. doi:10.21474/ijar01/4731. ISSN 2320-5407.