झाडांनी दाटलेल्या भागाला वन (इतर नावे: जंगल, रान ; इंग्लिश: Forest ;) असे म्हणतात. एकेकाळी पृथ्वीच्या भूपृष्ठाचा ५० % भाग व्यापणाऱ्या वनांनी वर्तमानात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ९.४ % भाग, अर्थात भूपृष्ठाचा ३० % भाग, व्यापला आहे. वनांमध्ये सजीवांना नैसर्गिक आश्रय लाभतो, तसेच वनांमुळे जलचक्राचे नियमन व भूपृष्ठाचे संरक्षण होते. जंगल आपल्या गरजा भागवतात उदा. लाकूड, औषधी वनस्पती.वन म्हणजे वृक्षांचे वर्चस्व असलेले मोठे क्षेत्र आहे.

टास्मानिया, ऑस्ट्रेलिया येथील हेल्यर घळीतील सदाहरित वन

वनाचे प्रकार

संपादन

(१) सदाहरित वने (२) निमसदाहरित वने (३) पानझडी वने (४) वर्षावने (५) सूचिपर्णी वने(६) उष्ण कटीबंधीय वने

 
वनाचे दृश्य

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत