पृथ्वी

सौर मंडळ मध्ये सूर्या पासून तिसरा ग्रह

पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.

पृथ्वी  
कक्षीय गुणधर्म
इपॉक J2000
अपसूर्य बिंदू१५,२०,९७,७०१ कि.मी.
१.०१६७१०३३३५ खगोलीय एकक
उपसूर्य बिंदू: १४,७०,९८,०७४ कि.मी.
०.९८३२८९८८१२ खगोलीय एकक
अर्धदीर्घ अक्ष: १४,९५,९७,८८७.५ कि.मी.
१.००००००११२४ खगोलीय एकक
वक्रता निर्देशांक: ०.०१६७१०२१९
परिभ्रमण काळ: ३६५.२५६ दिवस
१.००००१७५ वर्ष
सरासरी कक्षीय वेग: २९.७८३ कि.मी./से.
१०७,२१८ कि.मी./तास
कक्षेचा कल: संदर्भ (०)
७.२५° सूर्याच्या विषुववृत्ताशी
असेंडिंग नोडचे रेखावृत्त: ३४८.७३९३६°
उपसूर्य बिंदूचे अर्ग्युमेंट: ११४.२०७८३°
कोणाचा उपग्रह: सूर्य
उपग्रह: १ (चंद्र)
भौतिक गुणधर्म
सरासरी त्रिज्या: ६,३७१.० कि.मी.
विषुववृत्तीय त्रिज्या: ६,३७८.१ कि.मी.
धृवीय त्रिज्या: ६,३५६.८ कि.मी.
फ्लॅटनिंग: ०.००३३५२८
परीघ: ४०,०७५.०२ कि.मी. (विषुववृत्तीय)
४०,००७.८६ कि.मी. (रेखावृत्तीय)
४०,०४१.४७ कि.मी. (सरासरी)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: ५१,००,७२,००० कि.मी.² [१]
१४,८९,४०,००० कि.मी.² जमीन (२९.२ %)
३६,११,३२,००० कि.मी.² पाणी (७०.८ %)
घनफळ: १.०८३२०७३ × १०१२ कि.मी.³
वस्तुमान: ५.९७३६ × १०२४ किलोग्रॅम
सरासरी घनता: ५.५१५३ ग्रॅ./सें.मी.³
मुक्तिवेग: ११.१८६ कि.मी./से.
४०,२७० कि.मी./तास
सिडेरियल दिनमान: ०.९९७२५८ दिवस
२३ तास ५६ मि.०४.०९०५४ से.
विषुववृत्तावरील परिवलनवेग: ४६५.११ मी./से.
आसाचा कल: २३.४३९२८१°
उत्तर धृवाचे अक्षवृत्त: ९०
परावर्तनीयता: ०.३६७
पृष्ठभागाचे तापमान:
   सेल्सियस
   केल्व्हिन
किमानसरासरीकमाल
-८९°१४°५७.७°
१८४२८७३३१
विशेषणे: पार्थिव
वातावरण
पृष्ठभागावरील दाब: १०१.३ कि.पा. (समुद्रसपाटीवर)
संरचना: ७८.०८% नायट्रोजन (N2)
२०.९५% ऑक्सिजन (O2)
०.९३% आरगॉन
०.०३८% कार्बन डायॉक्साइड
बाष्प (हवामानानुसार बदलते)


पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.

पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे २० सेकंद लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती; पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असावी.

पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही गृहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकिय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रमुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रवीय क्षेत्राकडे वळतात.

पृथ्वीची संरचना

संपादन

आंतररचना

संपादन

पृथ्वीच्या सर्वांत वरचे आवरण म्हणजे भूकवच होय. त्याखाली प्रावरण असते. प्रावरणाखाली ब्रह्यगाभा व त्याखाली अंतर्गाभा असतो

पृथ्वीची आकृति अंडाकार आहे. घुमावामुळे, पृथ्वी भौगोलिक अक्षावर चपटे आणि भूमध्य रेखा जवळ उंचवटा घेतल्या सारखे दिसते. भूमध्य रेखा वर पृथ्वीचे व्यास, अक्ष-ते-अक्षच्या व्यास पासून ४३ किलोमीटर (२७ मैल) जास्त मोठा आहे. अशा प्रकारे पृथ्वीच्या केंद्रापासून तळापर्यंतची सर्वात लांबचे अंतर, इक्वाप्रकारे भूमध्यवर्ती चिंबोराज़ो ज्वालामुखीच्या शिखर पर्यंतची आहे. अशा प्रकारे पृथ्वीचे जवळपास व्यास १२,७४२ किलोमीटर (७, ९१८ मैल) आहे. काही जागेची स्थलाकृति या आदर्श मापापेक्षा वेगळी दिसते. जेव्हा की वैश्विक स्तरावर हे पृथ्वीच्या त्रिज्याच्या तुलनेत नजरअंदाज केलेले दिसतें. सर्वात जास्त विचलन ०.१७%चे मारियाना गर्त (समुद्रीस्तर पासून १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) खाली) मध्ये आहे जेव्हा की माउंट एवरेस्ट (समुद्र स्तर पासून ८,८४८ मीटर (२९,०२९ फीट) वर) ०.१४%चे विचलन दर्शविते. जर पृथ्वी, एक बिलियर्ड चेंडूच्या आकारात असेल तर, पृथ्वीचे काही क्षेत्र जसे मोठे पर्वत श्रृंखला आणि महासागरीय दरी, लहान दरींसारखी दिसतील जेव्हा की ग्रहांचा अधिकतम भू-भाग, जसे की विशाल हिरवेगार मैदान आणि शुष्क पठार इत्यादी, गुळगुळीत दिसतील.

रासायनिक संरचना [२].

बाह्यरचना

संपादन
 

कक्षा आणि परिभ्रमण

संपादन

परिभ्रमण

रासायनिक संरचना यौगिक, रसायनिक सूत्र पृथ्वीच्या रचनेत खालील तत्त्वांचे योगदान आहे-

34.6% आयर्न 29.5% ऑक्सिजन 15.2% सिलिकॉन 12.7% मॅग्नेशियम 2.4% निकेल 1.9% सल्फर 0.05% टाइटेनियम बाकी अन्य

जीवसृष्टी

संपादन
मुख्य लेख: चंद्र

चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३ लाख ८४ किमी आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या १/६ पट आहे. चंद्र आदल्या दिवशी पेक्षा ५० मिनिटे उशीरा उगवतो. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. हा साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वीपासून पृथ्वीला प्रदक्षिणा घालू लागला.

सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती

संपादन

महाभारतातील पृथ्वीचे वर्णन

संपादन

महाभारतामध्ये भारताच्या वर्णनाप्रमाणेच जगातील अन्य भौगोलिक स्थळांचे वर्णन आढळते. उदा. मंगोलियाचे गोबी वाळवंट, इजिप्तची नाईल नदी, लाल समुद्र, इ.

तसेच महाभारतातल्या भीष्म पर्वातील जम्बुखंड- विनिर्माण पर्वात संपूर्ण पृथ्वीचे मानचित्र सांगितले आहे. ते खालीलप्रमाणे-

सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन | परिमण्डलो महाराज द्वीपोसौ चक्रसंस्थितः ||
यथाहि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मनः | एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले ||
द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशेच शशो महान्

याचा अर्थ- 'हे कुरुनन्दन ! सुदर्शन नावाचे हे द्वीप चक्राप्रमाणे गोलाकार स्थित आहे. ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो, त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावरती दिसते. याच्यातील दोन अंशांमध्ये पिंपळाची पाने आणि दोन अंशांमध्ये मोठा ससा दिसतो.'

आता याप्रमाणे कागदावर रेखाटन केल्यास आपल्या पृथ्वीचे जे मानचित्र बनते, ते आपल्या पृथ्वीच्या वास्तव चित्राशी तंतोतंत जुळते.

अतिरिक्त माहिती

संपादन

ही माहिती मराठी विश्वकोशातून जशीच्या तशी उचलण्यात आलेली आहे. या माहितीचे नीट वर्गीकरण करण्याची गरज आहे.

पृथ्वीच्या उत्पत्ती नंतर भौगोलिक आणि जैविक प्रक्रियांनी तिच्यात खूप परिवर्तन झाले आहे. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

जलमंडल

पृथ्वी तळाच्या उंचीचा हिस्टोग्राम पृथ्वीच्या तळावर पाण्याची विपुलता एक अद्भूत वैशिष्ट्य आहे जे सौर मंडळाच्या अन्य ग्रहांपासून या "निळ्या ग्रहाला" वेगळे करते. पृथ्वीच्या जलमंडळात मुख्यतः महासागर आहे परंतु तांत्रिक रूपेण दुनियेत उपस्थित इतर पाण्याचे स्रोत जसे: अंतर्देशीय समुद्र, तलाव, नदी आणि २००० मीटर खोल भूमिगत पाण्यासहित यात सामावले आहे. पाण्यातील सर्वात खोल जागा १०,९११.४ मीटर खोल प्रशांत महासागर मध्ये मारियाना ट्रेंचची चैलेंजर डीप आहे.

महासागरांचे द्रव्यमान सुमारे १.३५×१०१८ मीट्रिक टन किंवा पृथ्वीच्या एकूण द्रव्यमानचे १/४४०० हिस्सा आहे. महासागर सुमारे ३६८२ मीटर खोल ३.६१८×१०८ किमी २ क्षेत्रफळामध्ये पसरलेला आहे. ज्याची अनुमानित मात्रा

राहण्याची क्षमता

संपादन

कॅनडा मधील रॉकी पर्वत मोराइन लेकला दुर्लक्षित करतात. जीवन टिकवून ठेवणारा एक ग्रह म्हणजे जगणे अस्तित्वात नसले तरीसुद्धा राहण्यायोग्य असे म्हटले जाते. पृथ्वी द्रव पाणी पुरवते- एक वातावरण जेथे जटिल सेंद्रिय अणू एकत्र येऊन संवाद साधू शकतात आणि चयापचय टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी ऊर्जा देऊ शकतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ Pidwirny, Michael (February 2, 2006). "Surface area of our planet covered by oceans and continents.(Table 8o-1)". University of British Columbia, Okanagan. 2007-11-26 रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य); |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ मराठी विश्वकोश, लेख: पृथ्वी.

पहा: चांदण्यांची नावे

साचा:खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख