पावसाळा

माझा प्रिय ऋतू
जगभरातील विविध देशातील  तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळा हा ऋतू आहे. भारतातील उन्हा्ळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू.याला मोसमी पाउस असेही म्हणले जाते.  []पर्यटन संस्थेने त्याला "हिरवा ऋतू" (ग्रीन सीझन) असेही नाव आलंकरिक स्वरूपात दिलेले आहे.

अरबी शब्द मौसम यापासून मान्सून असा शब्द तयार झाला आहे. मौसम याचा अर्थ ऋतू असा आहे.[]

जगभरात

संपादन

Rainy जगातील विविध ठिकाणी पावसाळ्याचे-पर्जन्यमानाचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे.प्रमाण वेगळे आहे. काही देशात केवळ एकदाच पावसाळा असतो तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. उष्ण कटिबंधात पावसाळा अधिक प्रमाणात असतो, कारण दिवसभर असलेल्या सूर्याच्या प्रखरतेमुळे हवेत असलेल्या आर्द्रतेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्याचे रूपांतर पाण्यात होऊन संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते.विषुववृत्तीय परदेशात वनांच्या परदेशात पावसाळा असा स्वतंत्र ऋतू नसून तेथे वर्षभर पाऊस पडत असतो.[]

भारतात

संपादन

भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी पावसाळ्याचे महत्त्व भारतात विशेष आहे. [] दक्षिणेतील समुद्रात तयार होणार-या हवेच्या कमी दांबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. याचे परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो ज्याला मान्सून असे म्हणले जाते.[]यामुळे भारताचा विचार करता अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो.[]

 
पावसाळ्यातील दक्षिण कर्नाटकातील दृश्य
 
पावसआल्यातील भातलावणी(दक्षिण भारत)

पावसाळ्यात घडून येणारे बदल

संपादन
  • अन्नधान्य-

प्रामुख्याने उष्ण परदेशातील गवताळ भागात वनस्पतींची वाढ होण्याचे सर्वाधिक प्रमाण हे पावसाळ्यात असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अन्नधान्याची मुबलकता तुलनेने कमी असते. पावसाळ्यानंतर भरभरून पिके आल्यानंतर हा तुटवडा कमी होतो.[]

पावसाळ्याच्या सुरुवातीला गायी ,म्हशी गरोदर (गाभण) रहातात तसेच वासरांना जन्म देतात.[] परदेशातील मेक्सिकोसारख्या प्रांतात फुलपाखरे स्थलांतर करतात. []मासे,विविध प्रकारच्या बुरशी, बेडूक , आळंबीचे विविध प्रकार यांच्या वाढीचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते.[]

  • आपत्तीजन्य परिणाम-

पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येणे, त्यांच्या किना-यावरील प्रदेशाचे नुकसान होणे, पर्वतीय प्रदेशात भूसख्लन होणे अशा आपतींना सामोरे जावे लागते.

भारतातील सृष्टीसौंदर्य

संपादन

भारतातील जैवविविधता आणि पावसाळा यांचे समीकरण आहे. भारताच्या विविध प्रांतात पावसाळ्यात वाहणारे धबधबे,पश्चिम घाटातील निसर्गाचा हिरवेपणा याचा अनुभव घेता येतो.पावसाळ्यात येणार-या रानफुलांनी फुलणारं महाराष्ट्रातील सह्याद्रीचे पठार (सातारा जिल्ह्यातील कास पठार)प्रसिद्ध आहे. [१०] श्रावण महिन्यात भारतातील विविध राज्यात महिला आनंदाने सण आणि उत्सव साजरे करतात.[११]

 
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील पावसाळ्यातील दृश्य

संदर्भ

संपादन



ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर


  1. ^ a b American Meteorological Society (2000-01-24). "Final Report: Update of the Glossary of Meteorology, September 1, 1994 - August 3, 1999". Cite journal requires |journal= (सहाय्य)
  2. ^ Fowles, Jib (2000-02). Todd, Michael (22 June 1907?–22 March 1958), showman. American National Biography Online. Oxford University Press. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "CBS News/New York Times Monthly Poll #2, May 2010". ICPSR Data Holdings. 2011-08-11.
  4. ^ Pal, Indrani; Al-Tabbaa, Abir (2011-03-05). "Monsoon rainfall extreme indices and tendencies from 1954–2003 in Kerala, India". Climatic Change. 106 (3): 407–419. doi:10.1007/s10584-011-0044-6. ISSN 0165-0009.
  5. ^ "[PDF Reader FAQ and support]". 2009 ICSE Workshop on Software Quality. IEEE. 2009-05. doi:10.1109/wosq.2009.5071545. ISBN 9781424437238. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ 1939-, Frisancho, A. Roberto, (1993). Human adaptation and accommodation. Frisancho, A. Roberto, 1939-. Ann Arbor: University of Michigan Press. ISBN 0472095110. OCLC 26763611.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  7. ^ Modelling nutrient utilization in farm animals. McNamara, J. P. (John P.), France, J., Beever, D. E. Wallingford, Oxon: CABI Pub. 2000. ISBN 9780851999371. OCLC 228171380.CS1 maint: others (link)
  8. ^ Brower, Lincoln P.; Calvert, William H. (1985-07). "Foraging Dynamics of Bird Predators on Overwintering Monarch Butterflies in Mexico". Evolution. 39 (4): 852. doi:10.2307/2408685. ISSN 0014-3820. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ Bond, S I (1969). "Type Specimens Of Mammals In The San-Diego Natural History Museum". Transactions of the San Diego Society of Natural History. 15: 252–263. doi:10.5962/bhl.part.12059. ISSN 0080-5947.
  10. ^ डॉ मुळे सुरेखा. "वन पर्यटन कास पठार (११. १०. २०१७ )".
  11. ^ "The Beauty of Monsoon Season in India". www.walkthroughindia.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-20 रोजी पाहिले.