उन्हाळा
उन्हाळा हा भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी एक आहे. उन्हाळ्यात हवामान उष्ण आणि कोरडे असते. उन्हाळ्यात शाळा आणि विद्यापीठांना सुट्टी असते.
भारतात उन्हाळा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटताना दिसते. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे केले जातात, याच वेळी कलिंगड, फणस, इत्यादी फळे पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात आंबा पिकलेला दिसतो. याच काळात वळिवाचा वादळी पाऊस पडतो. उन्हाळ्यात सर्व शाळांना सुट्टी असते .
सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात.त्यामुळे तापमानात वाढ होते. महाराष्ट्र राज्यातील विदर्भात तर उन्हाचा कहरच असतो. उन्हामुळे पारा ४७० सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे (४६.७ किंवा ४७.६) राहू शकतो.[ संदर्भ हवा ]जमीन प्रचंड तापते. दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वाहत राहतात.भारताच्या इतरही राज्यांत साधारणतः हीच परिस्थिती असते. राजस्थानमध्ये ४९० इतके तापमानही राहते.[ संदर्भ हवा ]
तापमान वाढीची कारणे
संपादनलोकसंख्यावाढ, त्यामुळे होणारी उपलब्ध पाण्याची विभागणी, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटची बांधकामे, जमिनीवर झालेल्या रस्ते, पदपथ आदी बांधकामांमुळे जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत न मुरणे, पाण्याचा भूगर्भातून प्रचंड उपसा, औद्योगिकीकरण, इत्यादी कारणे आहेत.[ संदर्भ हवा ]
ऋतू |
---|
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा |
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर |
- जगातील सर्वांत उष्ण ठिकाणे" Archived 2010-06-03 at the Wayback Machine.
बाहेरील दुवे
संपादन- द हेल्थसाईट-मराठी Archived 2015-05-09 at the Wayback Machine.
सन २०१६ च्या उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील उंचगाव परिसरातील नारळीची झाडे मारू लागली,तर काही मरणांत स्थितीत आहेत.आत्ताच पडलेल्या पावसाने थोडा झाडांना दिलासा दिला आहे.सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो.