फळ

फुलांच्या रोपाचा एक भाग

फुलझाडांमध्ये परागीकरण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रूपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय. फळे खाल्याने ऊर्जा मिळते.

फळांचा बाजार
ऍप्रिकॉट नावाचे फळ यात दोन प्रकार दिसत आहेत.
केळी
पिकलेला आंबा

फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणीपक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विष्टेद्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
फळे विविध प्रकारची असतात. आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळांची उदाहरणे आहेत. फळ हे आरोग्यासाठी उपयोगी आहे. फळांचा राजा म्हटल्यावर आंबा या फळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.


बिनबियाची फळे

व्यापारातील काही फळांचा बीजोपचार हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. केळी आणि अननस ही बियाणेरहित फळांची उदाहरणे आहेत.

वापर = मानवी अन्न म्हणून उत्पादित खाद्यपदार्थांमध्ये फळे (उदा. केक्स, कुकीज, आइस्क्रीम, मफिन्स, किंवा दही) किंवा पेये (उदा. सफरचंदाचा रस, द्राक्षाचा रस किंवा संत्र्याचा रस) किंवा अल्कोहोलयुक्त पेये (उदा. ब्रॅंडी, फळ बियर किंवा वाईन).

फळांचे प्रकार

फळांचे मुख्य तीन प्रकार आहेत : साधारण फळ, गुच्छेदार फळ आणि बहुखंडित फळ.

साधारण फळ

साधारण फळ- बोरे, करवंदे, जांभळे, वगैरे.

फळ म्हणजे फुलाच्या तळाशी असणारा एक साधारण किंवा मिश्रित अंडाशय, ज्यात फक्त एक पुंकेसर असून पिकल्यावर एक साधारण फळ प्राप्त होते. ते सुकलेले किंवा मांसल होऊ शकते. सुका मेवा पिकल्यावर त्याचे बी फुटून बाहेर पडते, किंवा न फुटता फळातच राहते.