खगोलशास्त्रानुसार आसाचा कल म्हणजे एखाद्या ग्रहाच्या अक्षाने ग्रहाच्या कक्षेवर काढलेल्या काल्पनिक लंबरेषेशी केलेला कोन. किंवा दुसऱ्या शब्दांत, एखाद्या ग्रहाच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेच्या पातळीचा ग्रहाच्या विषुववृत्तीय पातळीशी झालेला कोन. ग्रहाऐवजी दुसरी एखादी चांदणी असेल तरी तिच्या आस कलता असू शकतो, आणि तो असाच मोजला जातो.