पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे विषुववृत्तापासून उत्तर अथवा दक्षिणेकडील अंशात्मक अंतर अक्षांश या प्रमाणाने मोजले जाते. अर्थात एखाद्या ठिकाणाचा अक्षांश हा पृथ्वीच्या मध्यापासून त्या ठिकाणापर्यंत काढलेल्या रेषेचा विषुववृत्ताच्या प्रतलाशी होणारा कोन होय. साधारणपणे हा कोन अंशांमध्ये दर्शवितात. हा कोन विषुववृत्ताशी 0° पासून उत्तर अथवा दक्षिण धृवापर्यंत 90° असा बदलतो.

World map longlat.svg
पृथ्वीचा नकाशा
रेखांश (λ)
ह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत.
अक्षांश (φ)
ह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्‍या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.
विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. World map with equator.svg

अक्षांश हे प्रमाण सर्वसाधारणपणे phi, या ग्रीक अक्षराने दर्शविले जाते.

हे पहासंपादन करा