जाखू मंदिर हे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला मध्ये "जाखू" डोंगरावर वसलेले हनुमानाचे मंदिर आहे. धार्मिक पर्यटना व्यतिरिक्त हे स्थळ ट्रेकिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे.

आख्यायिका संपादन

आख्यायिकेनुसार रामायणातील युद्धा दरम्यान ज्यावेळी लक्ष्मण बाण लागल्यामुळे बेशुद्ध झाला होता तेव्हा त्याचा इलाज करण्यासाठी वैद्य सुशेन यांच्या सांगण्यावरून भगवान श्री रामाने त्यांचे भक्त हनुमानास हिमालयातून संजीवनी आणण्यास सांगितले. हनुमान संजीवनी आणण्यासाठी जात असताना त्यांना मार्गात एक ऋषीमुनी डोंगरावर ध्यानस्थ दिसले. संजीवनी संदर्भात माहिती घेन्याकारिता हनुमान त्या डोंगरावर उतरले व "यक्ष" ऋषीची भेट घेतली.

यक्ष ऋषीकडून मार्गदर्शन घेऊन हनुमान परत येण्याचे वचन देऊन हिमालयाकडे मार्गस्थ झाले.परंतु हिमालयाकडे संजीवनी आणण्यासाठी जात असताना त्यांना मार्ग "कालीनेमी" नामक राक्षसाने अडवला. तेव्हा त्या राक्षसाशी युद्ध करून हनुमानाने संजीवनी प्राप्त केली. परंतु या सगळ्यामुळे उशीर झाला व हनुमान परत "यक्ष" ऋषींना भेटण्यासाठी जाऊ नाही शकले.

यक्ष ऋषी मात्र त्यांच्या परतण्याची आतुरतेणे वाट बघत राहिले. किंतु जेव्हा हनुमान नाही परत आले तेव्हा ऋषी व्याकूळ झाले. म्हणून हनुमानाने स्वतः डोंगरावर प्रकट होऊन मुनींना दर्शन दिले. असे म्हटले जाते कि मुनींनी त्याच जागेवर हनुमानाची मूर्ती स्थापित केली. आज ही मूर्ती मंदिरात समाविष्ट केलेली आहे.

"यक्ष" मुनींच्या नावावरून या डोंगराचे नाव सुरुवातीला "यक्ष" ठेवण्यात आले. परंतु त्याचा अपभ्रंश "यक्ष"चे "याक", "याक"चे "याखु" आणि "याखु"चे "जाखू" असा झाला. हनुमानाच्या पद्चीन्हाना संगमरमरच्या दगडात समाविष्ट करून त्याचे शिल्प बनवून जतन करण्यात आले आहे. पर्यटक आज देखील त्याचे दर्शन घेऊ शकतात.

इतर माहिती संपादन

हे मंदिर समुद्रसपाटी पासून ८०४८ फुटाच्या उंची वर वसलेले आहे. वर्ष २०१० मध्ये हिमाचल प्रदेशच्या राज्य सरकारने येथे १०८ फुटी हनुमान मूर्तीची स्थापना केली. ही भारतातील दुसरी सर्वात उंच मूर्ती आहे. ही मूर्ती पूर्ण शिमला मधून दृष्टीस पडते. येथे पायी पायी, खाजगी गाडीने किवा रोपवेने पोहचता येते. पायी पायी चालणाऱ्या भक्तांसाठी प्रवेश द्वारा जवळच लाकडी काठीची व्यवस्था केली गेली आहे. ही लाकडी काठी वर चढण्यासाठी व माकडांना हुस्कविण्यासाठी कामी येते.

रोपवेने जाणाऱ्या पर्यटकांना शिमला मधील "रीद्ज" नामक जागेवरून मंदिराकडे जाता येते. शिमलातील सुप्रसिद्ध माल रोड वरून देखील जाखू मंदिराकडे जाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. या मंदिराकडे पोहचण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक "शिमला" आहे. हरियानातील कालका येथून "शिमला" साठी रेल्वे सुटते. सर्वात जवळचे बस स्टेशन हिमाचल परिवहनच्या अखत्यारीतले "शिमला" बस स्टेशन आहे. लवकर पोहोचण्यासाठी पर्यटक हवाई मार्गाचा अवलंब देखील करू शकतात. "ज्वारभाटी" विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. हा विमानतळ शिमला पासून २२ किलोमीटरच्या अंतरावर बनवले गेलेले आहे. "ज्वारभाटी" विमानतळासाठी "दिल्ली" येथून विमानसेवा उपलब्ध आहे.

हिमाचल प्रदेशचे राज्य सरकार दरवर्षी या डोंगरावर पर्वतागीर्यारोहानाचे कार्यक्रम आयोजित करते. जेणेकरून या डोंगराचा विकास व्हावा व संपूर्ण जगात याची ख्याती पोहचावी.

बाह्य दुवे संपादन