हनुमान
हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे वडील केसरी. वीर मारुती हा अतिशय ताकदवान-महाबली होता. त्याला अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या. लहानपणी त्याला भूक लागली असल्याने तो सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने सूर्याकडे धाव घेऊ लागला. परंतु सूर्याला पकडताच त्याचे हात सूर्याच्या आगीने चळाचळा कापू लागले त्यामुळे तो सूर्यापासून थोडा लांब झाला परंतु त्याला तो
खेळ च वाटू लागला तो सारखा सूर्याला पकडे व सोडी त्यामुळे सूर्यही त्याला घाबरु लागला. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले, व तो बेशुद्ध पडला. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला.
हनुमान | |
![]() हनुमान | |
शस्त्र | गदा |
वडील | केसरी |
आई | अंजनी |
अन्य नावे/ नामांतरे | हनुमंत, बजरंगबली, आंजनेय, पवनपुत्र, वायुपुत्र |
मंत्र | मारुतिस्तोत्र |
नामोल्लेख | रामायण, महाभारत |
विशेष माहिती | रामाचा दूत व भक्त, वानर |
पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेला पोचवला. याच वेळ जम्बुवन्ताने आठवण करून दिल्याने त्याला त्याच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली. ते वर्ष इ.स.पू. ५०६७ होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे.[ संदर्भ हवा ]
लंकाधिपती च्या-रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला कापड्याच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली. तेव्हा त्याने घरांघरांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.
हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले.
मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो. तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता.
जन्मतिथीसंपादन करा
हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते.. तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात, तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते.
- चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते.
- हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.
- वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला. चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते, असे म्हटले जाते.
- भारतातील दाक्षिणात्य ग्रंथांमध्ये हनुमानाला सुवर्चला नावाची पत्नी होती. ती सूर्यदेवाची कन्या होती. हनुमानाचे हे लग्न ज्येष्ठ शुद्ध दशमीला झाले.
मारुतीचे नाव असलेली नाटके/सिनेमेसंपादन करा
झोपलेल्या हनुमानााच्या मूर्तीसंपादन करा
भारतात अशा आठ मूर्ती आहेत : १. भद्रा मारुती (खुलताबाद येथील घृष्णेश्वराच्या जवळ). २, अलाहाबादेत यमुनेच्या तीरावर (संगम घाटावर) ३, मध्य प्रदेशात जाम सावली येथे ४. राजस्थानमध्ये अलवर येथे ५. राजकोट ६. इटावा जिल्ह्यात पिलुआ गावात ७. चांदोली जिल्ह्यात आणि ८. छिंदवाडा येथे.
झोपलेले गणेशसंपादन करा
अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाणे (तालुका शेवगाव) येथे झोपलेल्या गणपतीची तथाकथित स्वयंभू मूर्ती आहे.