कोहिमा
नागालँड राज्याची राजधानी
कोहिमा ही भारत देशाच्या नागालँड राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. कोहिमा शहर नागालँडच्या दक्षिण भागात वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले कोहिला दिमापूर खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
कोहिमा | |
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | नागालँड |
जिल्हा | कोहिमा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,७३८ फूट (१,४४४ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ९९,०३९ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
राष्ट्रीय महामार्ग ३९, राष्ट्रीय महामार्ग ६१ व राष्ट्रीय महामार्ग १५० हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग कोहिमामधून जातात. दिमापूर विमानतळ हा नागालँड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे.
कोहिमा रिज
संपादनकोहिमा रिज ही कोहिमा आणि दिमापूर या शहरांच्या मध्ये असलेली डोंगरधार आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लढल्या गेलेल्या कोहिमाच्या लढाईत येथे घनघोर युद्ध झाले.