कर्नाटक विधानसभा
कर्नाटक विधानसभा (कन्नड: ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನ ಸಭೆ) हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: कर्नाटक विधान परिषद). २२५ आमदारसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचे कामकाज बंगळूरमधून चालते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे के.बी. कोळीवाड विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे विधानसभेचे नेते आहेत.
bicameral state legislature of Karnataka in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा, bicameral legislature | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Karnataka Legislature | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | कर्नाटक | ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे कर्नाटक विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ११३ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान कर्नाटक विधानसभा २०१३ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.
सद्य विधानसभेची रचना
संपादन- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (135)
- भारतीय जनता पक्ष (66)
- जनता दल (धर्मनिरपेक्ष) (19)
- एस.के.पी. (1)
- अपक्ष (3)[१] [२]