बिहार विधानसभा हे भारताच्या बिहार राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: बिहार विधान परिषद). २४३ आमदारसंख्या असलेल्या बिहार विधानसभेचे कामकाज पाटणामधून चालते. जनता दल (संयुक्त) पक्षाचे विजयकुमार चौधरी विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री नितीश कुमार हे विधानसभेचे नेते आहेत.

बिहार सरकारची मुद्रा

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे बिहार विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे १२३ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान बिहार विधानसभा २०१५ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.

सद्य विधानसभेची रचनासंपादन करा

महा गठबंधन (सत्ताधारी आघाडी)
  राष्ट्रीय जनता दल (80)
  जनता दल (संयुक्त) (71)
  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (27)

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (विरोधी पक्ष)
  भारतीय जनता पक्ष (53)
  लोक जनशक्ती पक्ष (2)
  राष्ट्रीय लोक समता पक्ष (2)
  हिंदुस्तानी आवाम मोर्चा (1)
  भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन (3)
  अपक्ष (4)

बाह्य दुवेसंपादन करा