नागालँड विधानसभा
नागालॅंड विधानसभा हे भारताच्या नागालॅंड राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६० आमदारसंख्या असलेल्या नागालॅंड विधानसभेचे कामकाज कोहिमा शहरामधून चालते. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे शारिंगेन लोंगकुमेर हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री नेफिउ रिओ विधानसभेचे नेते आहेत.
भारतातील नागालँडची एकसमान राज्य विधानसभा | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Government of Nagaland | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | नागालँड | ||
भाग |
| ||
| |||
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे नागालॅंड विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १२वी विधानसभा २०१८ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी ह्या पक्षाने १८ जागांवर विजय मिळवून भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले तर नागा पीपल्स फ्रंटला २५ जागा जिंकून देखील सरकार स्थापन करता आले नाही.
सद्य विधानसभेची रचना
संपादन- नागा पीपल्स फ्रंट (25)
- नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (21)
- भारतीय जनता पार्टी (12)
- अपक्ष (2)
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-06-28 at the Wayback Machine.