डेहराडून

भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर.
(देहरादून या पानावरून पुनर्निर्देशित)

डेहराडून ही भारताच्या उत्तराखंड राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. डेहराडून शहर उत्तराखंडच्या पश्चिम भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डून खोऱ्यामध्ये वसले आहे. गंगा नदी डेहराडूनच्या पूर्वेकडून तर यमुना नदी पश्चिमेकडून वाहते. डेहराडून भारताची राजधानी दिल्लीच्या २३६ किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली डेहराडूनची लोकसंख्या सुमारे ५.७८ लाख होती. आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डेहराडूनमध्ये अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. नैनिताल, मसूरी इत्यादी पर्यटनस्थळे तसेच हरिद्वार, ऋषिकेश इत्यादी धार्मिक स्थाने येथून जवळच असल्यामुळे डेहराडून एक गजबजलेले शहर आहे.

डेहराडून
भारतामधील शहर

घंटा घर
डेहराडून is located in उत्तराखंड
डेहराडून
डेहराडून
डेहराडूनचे उत्तराखंडमधील स्थान
डेहराडून is located in भारत
डेहराडून
डेहराडून
डेहराडूनचे भारतमधील स्थान

गुणक: 30°19′0″N 78°1′44″E / 30.31667°N 78.02889°E / 30.31667; 78.02889

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा डेहराडून जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,४२७ फूट (४३५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,७८,४२०
  - महानगर ७,१४,२२३
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


वाहतूक

संपादन

जॉली ग्रँट विमानतळ देहरादूनच्या २२ किमी आग्नेयेस स्थित असून येथे एर इंडिया, जेट एरवेझस्पाइसजेट ह्या कंपन्या मुंबई, दिल्ली, बंगळूर इत्यादी शहरांहून थेट प्रवासी विमानसेवा पुरवतात.

डेहराडून रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग ७२राष्ट्रीय महामार्ग ७२ ए देहरादूनमधूनच जातात.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन