जेट एरवेझ

भारतातील एक विमान वाहतूक कंपनी

IATA:9W, ICAO:JAI, कॉलसाइन:JETAIRWAYS

SM सेंटर, जुने मुख्यालय

जेट एरवेझ (इंग्लिश: Jet Airways) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी आहे. [] जेट एरवेझचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतातील व जगभरातील एकूण ६८ शहरांमध्ये जेट एरवेझची विमानसेवा आहे. कंपनीच्या विमानांसाठी अबूधाबी हे मुख्य विश्रांतिस्थळ असून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर ही दुय्यम विश्रांतिस्थळे आहेत. [] बेल्जियम येथील ब्रुसेल्स विमानतळ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारतात विमानवाहतूक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणणारी जेट एरवेझ ही पहिली कंपनी आहे.[]

इतिहास

संपादन

१ एप्रिल १९९२ रोजी जेट एरवेझ ही कंपनी एर टॅक्सी ऑपरेटर म्हणून अस्तित्वात आली. ५ मे १९९३ रोजी भाड्याने घेतलेल्या ४ बोइंग ७३७-३०० विमानाच्या उड्डाणाने खऱ्या अर्थाने कंपनीची विमानवाहतूक सुरू झाली.

आरंभ आणि वाढ

संपादन
२०१०-सद्यःस्थिती
भारतामधील विमानवाहतूक क्षेत्रातील सर्वांत मोठया कंपनीचा उदयः

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया अहवालानुसार प्रवासी वाहतूक करण्याच्या क्षमतेमध्ये जेट एरवेझ (जेट + जेटलाईट) या कंपनीचा इ.स. २०१०च्या अखेरीसचा बाजारपेठेतील हिस्सा भारतामध्ये सर्वांत जास्त, २२.६ % इतका आहे.[] त्याखालोखाल किंगफिशरचा हिस्सा १९.९% इतका असून विमानसेवा देण्यामध्ये ती कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. २४ एप्रिल २०१३ रोजी जेट एरवेझने २४% समभाग युनायटेड अरब अमिरातीच्या मालकीची असलेल्या एथिॲड विमानकंपनीला ३७९ मिलियन अमेरिकन डॉलरना विकण्याची तयारी दर्शविली होती.[] परंतु याबाबतची अंतिम कार्यवाही अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाही.[]

रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतर जेट एरवेझने कंपनीला नफा मिळविण्याच्या उद्देशाने संपूर्ण कंपनीचा लेखाजोगा घेऊन विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांमध्ये प्रथमच चार वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देऊ केलेल्या आहेत.

जागतिक उलाढाल

संपादन

मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या सियोरा सेंटर या जेट एरवेझच्या मुख्यालयामधून विमान प्रवासाबाबतच्या जागतिक उलाढाली होत असतात.[]

सहकंपन्या

संपादन

जेटलाईट

संपादन

२० सप्टेंबर १९९१ पासून सहारा एरलाइन्सची जेटलाईट ही जेट एरवेझची सह-कंपनी म्हणून काम करते आहे. ३ डिसेंबर १९९३ रोजी २ बोइंग ७३७-२०० विमानाच्या उड्डाणाने जेटलाईटने विमानवाहतूक करण्यास सुरुवात केलेली आहे.

जेटकनेक्ट

संपादन

जेट एरवेझची जेटकनेक्ट, पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट ही सर्वांत कमी दर असलेली सह-कंपनी आहे. ८ मे २००९ रोजी या कंपनीने विमानवाहतुकीसाठी बोइंग ७३७ या विमानाचा वापर सुरूकेला आहे.[]

स्थानके

संपादन

जेटकनेक्ट ही कंपनी आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांमध्ये ५२ स्थानिके आणि २१ आंतराराष्ट्रीय स्थानके अशा एकूण ७३ स्थानकांपर्यंत प्रवाशांना विमानसेवा उपलब्ध करून देते.[] बोईंग ७३७ ही विमाने जवळच्या ठिकाणी प्रवाशांना पोहोचविण्यासाठी, आणि एरबस ए३३०-२०० आणि बोइंग 777-३०० ई आर ही विमाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरली जातात. २००५ मध्ये, जेटकनेक्टची लंडन, इंग्लंड सारख्या दूरच्या स्थानकांपर्यंत विमानसेवा सुरू झाली.

जून २०१३ रोजी जेट एरवेझने खालील विमानसेवा कंपन्यांशी सांकेतांक करार केलेला आहे.[१०] [११]

उड्डाणे

संपादन
Jet Airways Fleet
विमान सेवा मागणी प्रवासी शेरा
एफ जे वाय एकूण
ए३३०-२०० एरबस १०
३० १९६ २२६
ए३३०-३०० एरबस ३४ २५९ २९३
एटीआर ७२-५०० १६ ६२ ६२
६८ ६८
एटीआर ७२-६०० ६८ ६८ जेटकनेक्टसाठी वापरतात
बोइंग ७३७-७०० १६ १०२ ११८ जेटकनेक्टसाठी वापरतात
बोइंग ७३७-८०० ४८ २२ १६ १३८ १५४ जेटकनेक्टसाठी ६ वापरतात
१६२ १७०
बोईंग ७३७-९०० २८ १३८ १६६ जेटकनेक्टसाठी 2 वापरतात
बोइंग ७3७ एमएएक्स ८ ५०[१६] २०१७ मध्ये सेवा सुरू
बोइंग ७७७-३००ईआर १० ३0 २७४ ३१२ ३ तुर्की विमानसेवेला लीजवर
३0 ३१२ ३५0
बोइंग ७८७-९ १० टीबीए २०१५ पासून पुरवठा सुरू
एकूण १०० ८६

विमानाची रंगसंगती

संपादन

फिकट निळा, करडा आणि सोनरी हे तीन रंग जेट एरच्या विमानावरील पृष्ठभागावर वापरलेले असून 'उडता सूर्य' हा या विमान कंपनीचा लोगो आहे.[१७]

सर्व विमानामध्ये पॅनासॉनिक ईएफएक्स आयएफई सारख्या सुविधा दिल्यामुळे चित्रपट, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, संगीत, जगभरातील चॅनेलवरील सर्व कार्यक्रम यासारखी मनोरंजनाची साधने कोणत्याही वर्गाच्या प्रवाशांना विमानामध्ये बसल्या जागेवरून बघता येणे शक्य झाले आहे.[१८]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ २५ ऑगस्ट २००८, ०२.०८ AM IST, मिथुन रॉय, एत ब्यूरो. "'जेट लाईटचा या वर्षी जेट एरवेझमध्ये समावेश'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: multiple names: authors list (link) CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ मंजू व्ही, टीएनएन, १५ ऑक्टो २००८,. "'जेट एरवेझकडे ८५० वैमानिक तैनात'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link) CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ पीटीआय (२१ नोव्हेंबर २०१३). "जेट-एतिहाद कराराला अखेर अंतिम रूप". सकाळ. 2015-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
  4. ^ "'जेट एरवेझने २४ टक्के समभाग इथिॲड एरवेझला विकण्याची तयारी दाखविली'" (इंग्लिश भाषेत). 2013-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "'एथिॲडने जेट एरवेझशी करार करण्याचे नक्की झाले'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "'जेट एरवेझमध्ये स्पाईसजेट, इंडिगो यांचा सहभाग, सवलतींचा मारा'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "'जेट एरवेझचा एथिॲड बरोबर करार'" (इंग्लिश भाषेत). 2014-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "'जेट एरवेझच्या ताफ्यात पाच एटीआर-७२-६०० विमाने दाखल'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "'जेट एरवेझने १ फेब्रुवारी २०१३ पासून न्यू दिल्ली – मिलान वाहतूक बंद केली'" (इंग्लिश भाषेत). 2013-05-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ पीटीआय १७ जून २०१३, ०३.४७PM IST (१७ जून २०१३). "'जेट एरवेझने काही विमान कंपन्यांबरोबर सांकेतांक करार केला'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "कनेक्टिविटी अँड फ्लीट इन्फर्मेशन" (इंग्लिश भाषेत). 2014-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  12. ^ "'जेट एरवेझने काही विमान कंपन्यांबरोबर सांकेतांक करार केला'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  13. ^ "'जेट एरवेझने काही विमान कंपन्यांबरोबर सांकेतांक करार केला'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  14. ^ PTI १7 Jun 20१3, 03.47PM IST. "'उड्डाणविषयक माहिती'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  15. ^ "'जेट एरवेझने काही विमान कंपन्यांबरोबर सांकेतांक करार केला'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  16. ^ "'भारतातील पहिला डिस्ने प्लॅन उदयाला आला'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
  17. ^ "'जेटएरवेझने दोन नवीन विमाने ए३३०-३०० सुरू करण्याचा निर्णय'" (इंग्लिश भाषेत). 2014-06-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  18. ^ "'जेटएरवजेची फॅक्ट शीट- ऑक्टोबर -२०१२'" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन