एतिहाद एरवेझ

संयुक्त अरब अमिराती येथील विमान वाहतूक कंपनी

एतिहाद एरवेझ ही संयुक्त अरब अमिराती देशाच्या अबु धाबी शहरामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. २००३ साली स्थापन झालेली एतिहाद एरवेझ एमिरेट्स अमिरातीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. एतिहाद दर आठवड्याला जगातील ९६ शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूकीसाठी १,००० पेक्षा अधिक उड्डाणे करते.

एतिहाद एरवेझ
आय.ए.टी.ए.
EY
आय.सी.ए.ओ.
ETD
कॉलसाईन
ETIHAD
स्थापना २००३
हब अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर एतिहाद गेस्ट
विमान संख्या १०७
ब्रीदवाक्य From Abu Dhabi to the World The World Is Our Home, You Are Our Guest
मुख्यालय अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
संकेतस्थळ http://etihad.com/
एतिहाद एरलाइन्स प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी ह्या क्लबाचा प्रायोजक असल्यामुळे एतिहादने आपले एक एरबस ए३३० विमान मॅंचेस्टर सिटीच्या रंगामध्ये रंगवले आहे.
टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालेले एतिहादचे बोईंग ७७७ विमान

२००३ साली अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान ह्याने एका शाही फर्मानाद्वारे एतिहादची स्थापना केली. १२ नोव्हेंबर २००३ रोजी एतिहादचे पहिले विमान बैरूतकडे उडाले. एतिहादच्या निर्माणापूर्वी अबु धाबी विमानतळ वापरणारी गल्फ एर ही प्रमुख कंपनी होती. तेव्हापासून एतिहादने आपला आवाका झपाट्याने वाढवला असून ति सध्या जगातील एक आघाडीची विमानकंपनी समजली जाते. एतिहादने एर बर्लिन, अलिटालिया, एर सेशेल्स, एर लिंगस, व्हर्जिन ऑस्ट्रेलिया इत्यादी अनेक परदेशी विमानकंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. १ ऑगस्ट २०१३ रोजी एतिहादने सर्बियाच्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी याट एरवेझमध्ये ४९ टक्के गुंतवणूक केली. एतिहादच्या मदतीने सर्बिया सरकारने याटची पुनर्रचना करून एर सर्बियाची निर्मिती केली. भारतामधील जेट एरवेझमध्ये देखील एतिहादने २४ टक्के गुंतवणूक केली आहे.

इतिहास

संपादन

या कंपनीची स्थापना शेख खलिफा बिन झायेद अल नाहयन याने ५० कोटी दिनार भाग भांडवल गुंतवून सुरू केली.[] १२ नोव्हेंबर २००३ रोजी या कंपनीने अबुधाबी ते बैरुत अशी सेवा चालू केली. त्यापूर्वी गल्फ एर ही कंपनी अबुधाबीतून सेवा पुरवायची.

जून २००४ मध्ये या कंपनीने ८ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीच्या विमान खरेदीच्या मागण्या नोंदवल्या. त्यात ५ ७७७-३००ईआर, आणि एरबस ३८० सह २४ एरबस विमानांचा समावेश होता. डिसेंबर २०१४ मध्ये एतिहादने आपल्या पहिल्या ए३८० विमानाचा ताबा घेतला. फेब्रुवारी २०१३ च्या सुमारास एतिहाद आपल्या अबु धाबी तळावरून जगभरातील ८६ ठिकाणी प्रवाशी आणि माल वाहतूक विमान सेवा देत होती.

२०११मध्ये एतिहादला १ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलरचा फायदा झाला.[] डिसेंबर २०११मध्ये एतिहादने युरोपची ६ क्रमांकाची सर्वात मोठी विमानकंपनी एर बर्लिनचे २९.२१% भाग खरेदी केल्याची घोषणा केली[] आणि जेम्स होगन यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. यानंतर एदिहादने एर सेशेल्स (४०%), एर लिंगस (२.९८७%), व्हर्जिन ऑस्ट्रेलिया, इ. कंपन्यांतही भाग खरेदी केले.[]

१ ऑगस्ट २०१३ रोजी इतिहादचे उपाध्यक्ष जेम्स होगन यांनी सर्बियाचे पहिले उपपंतप्रधान अलेक्झांडर वुकिकशी बेलग्रेड येथे सर्बियाची राष्ट्रीय विमानकंपनी याट एरवेझ आणि एर सर्बियाचे ४९% भाग खरेदीकरारावर सही केली. त्यानंतर त्या सरकारकडे ५१% भाग शिल्लक राहीले. या नवीन कंपनीला एर सर्बिया नाव दिले. २०१३मध्ये एतिहादने स्वित्झर्लंडच्या डार्विन एरलाइन्सचे ३३.३३% भाग खरेदी केले आणि त्याचे नाव बदलून एतिहाद रीजनल एसे केले. १ ऑगस्ट २०१४ रोजी एतिहादने इटलीची प्रमुख विमानवाहतूक कंपनी अलिटालियाचे ४९% भाग ५६ कोटी पाउंडला विकत घेण्याचा करार केला.

गंतव्यस्थाने

संपादन

सप्टेंबर २०१३ अखेर एतिहाद आपल्या ११६ प्रवासी व मालवाहतुक विमानांकरवे आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामधील शहरांना अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानातळावरून विमान सेवा देते.[] इतिहाद एर चायना, ब्रिटिश एरवेझ, डेल्टा एर लाइन्स, एमिरेट्स, कोरियन एर, क्वांटास, कतार एरवेझ, सिंगापूर एरलाइन्स, साऊथ आफ्रिकन एरवेझ आणि युनायटेड एरलाइन्स यांच्या सहयोगाने ६ उपखंडाना विमान सेवा पुरविते.

कायदेशीर सहयोग करार

संपादन

इतिहाद एरवेझने खालील विमान कंपनीशी कायदेशीर व्यवसाय करार केलेले आहेत.

एजियन एर लाइन्स अवियंका केएलम
ऐर लिंगूस बँकॉक एरवेझ कोरियन एर
एरो लाइनअस अर्जेंटीनास बेलविय मलेशिया एरलाइन्स
एर अस्ताना ब्रुसेल्स एरलाइन्स मिडल पूर्व एरलाइन्स
एर बर्लिन चायना पूर्व एरलाइन्स निकी
एर कॅनडा झेक एरलाइन्स पाकिस्तान एर
एर युरोप डार्विन एर लाइन्स फिलिपीन एरलाइन्स
एर फ्रांस फिजी एर वेज रोयल एर मरोक
एर माल्टा फली बी एस 7 एरलाइन्स
एर न्यू झीलंड फ्लाय नास स्कंडींनावियन एरलाइन्स
एर सेयचेल्लेस गरुडा इंडोनेशिया श्रीलंकन एरलाइन्स
एर सेरबिया गोल लिंहास एरेयस साऊथ आफ्रिकनयरवेज
एर बाल्टिक हैनन एर लाइन्स टॅप पोर्तुगाल
अलितलीय हाँग काँग एर लाइन्स टर्किश एर लाइन
अल्ल निप्पॉन एरवेझ जेट एरवेझ व्हिएतनाम एरलाइन्स
अमेरिकन एर लाइन्स जेट ब्ल्यु एरवेझ व्हर्जिन औस्ट्रेलिया
एशियाना एर लाइन्स केनया एर लाइन्स फ्रेंच एर वेज

पुरस्कार

संपादन

इतिहाद विमान सेवा २००३ पासून सुरू झाली तेव्हापासून या कंपनीला ३० आवार्ड मिळाले. त्यात महत्त्वाचे म्हणजे :

वर्ष २००९ वर्ल्ड ट्रव्हल अवॉर्ड (WTA) बेस्ट ब्यूझिनेस क्लास
वर्ष २००९, २०१०, २०११, २०१२ वर्ल्ड ट्रव्हल अवॉर्ड (WTA) वर्ल्ड’स लिडिंग एरलाइन
वर्ष २०१० स्कायट्रक्स कडून वर्ल्ड’स बेस्ट प्रथम वर्ग
वर्ष २०१० स्कायट्रक्स कडून बेस्ट प्रथम वर्ग आहार
वर्ष २०१० स्कायट्रक्स कडून बेस्ट प्रथम वर्ग बैठक सेवा
वर्ष २०१३ स्कायट्रक्स कडून बेस्ट (प्रथम वर्ग २०१३)

दि.९ जून २०१४ रोजी इतिहादने स्कायट्रॅक्स मधून बाहेर पडत आहे असी घोषणा केली तरीसुद्दा स्कायट्रक्सने २०१५ या वर्षात जगातील पहिल्या ६ विमान सेवेतील इतिहाद कंपनी म्हणून अवॉर्ड दिला. ३ डिसेंबर २०१५ रोजी न्यू यॉर्क शहरात इतिहादची A380 विमानाची विमान सेवा सुरू करताना “एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड’स २०१६ एयर लाइन ऑफ द एर” ही घोषणा केली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "इतिहाद एरवेझचा इतिहास". 2016-06-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-16 रोजी पाहिले.
  2. ^ "एरवेझ इतिहाद नी पहिला नफा मिळवला".
  3. ^ "इतिहाद एरवेझनी एर बर्लिन मध्ये २९ टक्के समभाग विकत घेतले".
  4. ^ "इतिहाद एरवेझनी वर्जिन एरलाइनस मधली हिस्सेदारी १० टक्केनी वाढवली".
  5. ^ "इतिहाद एरवेझची विमान सेवा". 2015-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-16 रोजी पाहिले.
  6. ^ "इतिहाद एरवेझनी "एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड" पुरस्कार जिंकला".