एरबस ए३३०
एरबस ए३३० हे एरबस कंपनीने विकसित केलेले लांब पल्ल्याचे, मध्यम क्षमतेचे जेट विमान आहे. ७,४०० ते १३,४३० किमी अंतराची क्षमता असलेले ए३३० विमान कमाल ३३५ प्रवासी किंवा ७० टन माल वाहतूक करू शकते. ए-३३० चे ३३०-२०० आणि ३३०-३०० हे दोन उपप्रकार आहेत.
एरबस ए३३० | |
---|---|
फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे लुफ्तान्साचे एरबस ए३३०-३०० विमान | |
प्रकार | लांब पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान |
उत्पादक देश | अनेक |
उत्पादक | एरबस |
रचनाकार | एरबस |
पहिले उड्डाण | २ नोव्हेंबर १९९२ |
समावेश | १७ जानेवारी १९९४ |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
मुख्य उपभोक्ता | एर चायना चायना ईस्टर्न एरलाइन्स कॅथे पॅसिफिक |
उत्पादित संख्या | १,१३९ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा) |
प्रति एककी किंमत | ए३३०-२००: US$२२.१७ कोटी[१] ए३३०-३००: US$२४.५६ कोटी[१] ए३३०-२००एफ: US$२२.४८ [१] |
मूळ प्रकार | एरबस ए३०० |
ए३३०ची रचना ए३४०सारखीच आहे. ए३३०ला दोन तर ए३४०ला चार इंजिने असतात. ए३३०ला जीई सीएफ६, प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४००० आणि रोल्स-रॉइस ट्रेंट ७०० या तीन प्रकारची इंजिने बसवता येतात.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- एरबस ए३३० समूहाचे संकेतस्थळ Archived 2012-10-11 at the Wayback Machine.
संदर्भ
संपादन- ^ a b c "Airbus aircraft 2014 average list prices". Airbus S.A.S. 2014-02-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 1 February 2014 रोजी पाहिले.