लंडन (इंग्लिश: En-uk-London.ogg London ) हे इंग्लंडचेयुनायटेड किंग्डमचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच युरोपियन संघामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या ह्या शहराला २,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.

लंडन
London
युनायटेड किंग्डम देशाची राजधानी

London collage.jpg
सिटी ऑफ लंडन, टॉवर ब्रिज, लंडन आयबकिंगहॅम राजवाडा
London (European Parliament constituency).svg
लंडनचे युनायटेड किंग्डममधील स्थान

गुणक: 51°30′28″N 00°07′41″W / 51.50778°N 0.12806°W / 51.50778; -0.12806

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
काउंटी ग्रेटर लंडन
स्थापना वर्ष इ.स. ४३
महापौर बोरिस जॉन्सन
क्षेत्रफळ १,५७२.१ चौ. किमी (६०७.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७९ फूट (२४ मी)
लोकसंख्या  (जुलै २०१०)
  - शहर ७८,२५,२००[१]
  - घनता ४,९७८ /चौ. किमी (१२,८९० /चौ. मैल)
  - महानगर १,३९,४५,०००
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
लंडनचे संकेतस्थळ

लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जगातील एक प्रमुख शहर आहे. न्यूयॉर्क शहरटोकियोसोबत लंडन हे जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक केंद्र मानले जाते.[२][३][४]. तसेच युरोपातील सर्वात मोठे अर्थव्यवस्था असलेले शहर हा मान देखील लंडनकडेच जातो.[५] जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक लंडनमध्ये येतात[६] तसेच लंडन हीथ्रो विमानतळ हा आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीसाठी जगातील सर्वात मोठा विमानतळ आहे.[७]. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धा लंडनमध्ये भरवल्या गेल्या. ह्या स्पर्धांचे तिसऱ्यांदा आयोजन करणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे.

जुलै २०१० मध्ये ७८,२५,२०० इतकी लोकसंख्या असलेले लंडन युरोपामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते.[८] ग्रेटर लंडनची लोकसंख्या ८२,७८,२५१ तर लंडन महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.२ ते १.४ कोटी आहे.[९] लंडन शहराच्या समाजरचनेत कमालीचे वैविध्य आढळते. लंडन परिसरात ३०० भाषा बोलल्या जातात. सध्या लंडन परिसरात राहणारे ६.६ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.

इतिहाससंपादन करा

भूगोलसंपादन करा

हवामानसंपादन करा

लंडनमधील हवामान इतर पश्चिम युरोपीय शहरांप्रमाणे सौम्य व आर्द्र आहे.[१०] २०१० साली लंडन हे युरोपातील सर्वात प्रदुषित शहर होते.[११]

लंडन (हीथ्रो विमानतळ) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 14.0
(57.2)
16.0
(60.8)
21.0
(69.8)
26.9
(80.4)
31.0
(87.8)
35.0
(95)
35.5
(95.9)
37.9
(100.2)
30.0
(86)
26.0
(78.8)
19.0
(66.2)
15.0
(59)
37.9
(100.2)
सरासरी कमाल °से (°फॅ) 8.1
(46.6)
8.4
(47.1)
11.4
(52.5)
14.2
(57.6)
17.9
(64.2)
21.1
(70)
23.5
(74.3)
23.2
(73.8)
19.9
(67.8)
15.6
(60.1)
11.2
(52.2)
8.3
(46.9)
15.2
(59.4)
सरासरी किमान °से (°फॅ) 2.3
(36.1)
2.1
(35.8)
3.9
(39)
5.5
(41.9)
8.7
(47.7)
11.7
(53.1)
13.9
(57)
13.7
(56.7)
11.4
(52.5)
8.4
(47.1)
4.9
(40.8)
2.7
(36.9)
7.4
(45.3)
विक्रमी किमान °से (°फॅ) −10.0
(14)
−9.0
(15.8)
−8.0
(17.6)
−2.0
(28.4)
−1.0
(30.2)
5.0
(41)
7.0
(44.6)
6.0
(42.8)
3.0
(37.4)
−4.0
(24.8)
−5.0
(23)
−7.0
(19.4)
−10.0
(14)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 55.2
(2.173)
40.8
(1.606)
41.6
(1.638)
43.6
(1.717)
49.3
(1.941)
44.9
(1.768)
44.5
(1.752)
49.5
(1.949)
49.1
(1.933)
68.5
(2.697)
59.0
(2.323)
55.0
(2.165)
601.5
(23.681)
सरासरी हिमवर्षा सेमी (इंच) 24.4
(9.61)
10.8
(4.25)
2.7
(1.06)
0.4
(0.16)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.2
(0.08)
8.2
(3.23)
46.7
(18.39)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 1 mm) 10.9 8.1 9.8 9.3 8.5 8.4 7.0 7.2 8.7 9.3 9.3 10.1 106.6
सरासरी हिमवर्षेचे दिवस 4 4 3 1 0 0 0 0 0 0 1 3 16
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 91 89 91 90 92 92 93 95 96 95 93 91 92.3
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 61.4 77.7 113.9 167.6 197.0 205.5 210.9 203.4 148.3 115.9 72.3 51.8 १,६२५.७
स्रोत #1: बीबीसी हवामान,[१०][१२]
स्रोत #2: हवामान खाते,[१३]

अर्थकारणसंपादन करा

प्रशासनसंपादन करा

वाहतूक व्यवस्थासंपादन करा

 
लंडन अंडरग्राउंड ही जगातील सर्वात जुनी शहरी भुयारी रेव्ले आहे.

लंडन शहर इंग्लंड व जगातील इतर शहरांसोबत हवाई, रेल्वे व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे. हिलिंग्डन ह्या बरोमध्ये स्थित असलेला लंडन हीथ्रो विमानतळ हा युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठा व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. गॅट्विक विमानतळ हा येथील दुसरा एक महत्त्वाचा विमानतळ आहे. युरोस्टार ही चॅनल टनेलमधून धावणारी द्रुतगती रेल्वेसेवा लंडनला पॅरिसब्रुसेल्स शहरांशी जोडते. लंडन शहरात १८ लांब पल्ल्याची गाड्यांची एकूण १८ रेल्वे स्थानके आहेत. त्यांद्वारे ब्रिटनमधील सर्व लहानमोठ्या शहरांचा रेल्वे प्रवास सुलभपणे शक्य होतो.

शहरी वाहतुकीसाठी लंडन अंडरग्राऊंड ही जगातील सर्वात जुनी व दुसरी सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे सेवा कार्यरत आहे. २८० स्थानके जोडणाऱ्या ह्या रेल्वेचा वापर दररोज ३० लाख प्रवासी करतात. जगातील सर्वोत्तम शहरी वाहतूक असलेले शहर हा खिताब लंडनला मिळाला आहे.[१४]

लोकजीवनसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

संगीतसंपादन करा

पश्चिमात्य शास्त्रीयरॉक संगीताच्या इतिहासात लंडनला मानाचे स्थान आहे. अनेक ऐतिहासिक संगीत विद्यालये व संस्था लंडन शहरात आहेत. लंडन सिंफनी ऑर्केस्ट्रा हा नावाजलेला संगीतचमू लंडनच्या बार्बिकन सेंटरमध्ये भरतो. बीटल्स, द रोलिंग स्टोन्स, पिंक फ्लॉइड, क्वीन हे जगातील सर्वात लोकप्रिय बँड लंडनमध्येच स्थापण्यात आले. तसेच एल्टन जॉन, डेव्हिड बोवी, जॉर्ज मायकल, एमी वाइनहाऊस इत्यादी प्रसिद्ध गायक व संगीतकार लंडनचे रहिवासी होते.

प्रसारमाध्यमेसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

लंडन हे उच्च शिक्षणासाठीचे जगातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. लंडन महानगरामध्ये एकूण ४३ (युरोपात सर्वाधिक) विद्यापीठे आहेत. २००८ साली ४.१२ लाख विद्यार्थी लंडनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. १.२५ लाख विद्यार्थिसंख्या असलेला लंडन विद्यापीठ हा युरोपातील सर्वात मोठा विद्यापीठसमूह आहे. लंडन विद्यापीठामध्ये १९ स्वतंत्र उप-विद्यापीठे व १२ संशोधन संस्था आहेत. अनेक अहवालांनुसार, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इंपीरियल कॉलेज लंडन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन व्यापार विद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था या जगातील सर्वोत्कृष्ट संस्था असल्याचे सिद्ध झाले आहे.

खेळसंपादन करा

लंडनने आजवर १९०८, १९४८२०१२ ह्या तीन वेळा ऑलिंपिक खेळांचे आयोजन केले आहे. तीन वेळा ऑलिंपिक यजमानपदाचा बहुमान मिळवणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी येथे नवीन ऑलिंपिक मैदान बांधले गेले. फुटबॉल हा लंडनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लंडन परिसरात १४ व्यावसायिक फुटबॉल क्लब आहेत ज्यांपैकी आर्सेनल, चेल्सी, फुलहॅम, क्वीन्स पार्क रेंजर्सटॉटेनहॅम हॉटस्पर हे पाच क्लब इंग्लिश प्रीमियर लीगचे सदस्य आहेत. १९२४ सालापासून इंग्लंड फुटबॉल संघाचे स्थान जुने वेंब्ली मैदान येथे राहिले आहे. २००७ साली हे स्टेडियम पाडून त्याच ठिकाणी ९०,००० प्रेक्षकक्षमता असलेले नवे वेंब्ली स्टेडियम उभारण्यात आले.

रग्बी, क्रिकेटटेनिस हे येथील इतर लोकप्रिय खेळ आहेत. लॉर्ड्‌सओव्हल ही क्रिकेट जगतातील दोन ऐतिहासिक व प्रतिष्ठेची मैदाने लंडन शहरात आहेत. चार ग्रँड स्लॅममधील सर्वात मानाची मानली जाणारी विंबल्डन टेनिस स्पर्धा दरवर्षी जून-जुलै दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात खेळली जाते.

History of London

पर्यटन स्थळेसंपादन करा

जुळी शहरेसंपादन करा

खालील शहरांचे लंडनसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भसंपादन करा

टिपासंपादन करा

 1. ^ "July 2010 Population estimates for UK, England and Wales, Scotland and Northern Ireland". Office for National Statistics. 3 July 2011 रोजी पाहिले. 
 2. ^ "Global Financial Centres 9". Z/Yen. 2011. 
 3. ^ ""World's Most Economically Powerful Cities".". Forbes. 15 July 2008. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 19 May 2011 रोजी मिळवली). 3 October 2010 रोजी पाहिले. 
 4. ^ "Worldwide Centres of Commerce Index 2008". Mastercard. 
 5. ^ "Global city GDP rankings 2008–2025". PricewaterhouseCoopers. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 19 May 2011 रोजी मिळवली). 16 November 2010 रोजी पाहिले. 
 6. ^ "Euromonitor International's Top City Destination Ranking (2011 update)". Euromonitor International. 6 January 2011. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 8 August 2011 रोजी मिळवली). 8 August 2011 रोजी पाहिले. 
 7. ^ "Delta Expects New Slots To Foster Growth At Heathrow Airport". The Wall Street Journal. 23 February 2011. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 19 May 2011 रोजी मिळवली). 7 March 2011 रोजी पाहिले. 
 8. ^ "Largest EU City. Over 7 million residents in 2001". www.statistics.gov.uk. Office for National Statistics. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 26 July 2007 रोजी मिळवली). 28 June 2008 रोजी पाहिले. 
 9. ^ "KS01 Usual resident population: Census 2001, Key Statistics for urban areas". Office for National Statistics. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 19 May 2011 रोजी मिळवली). 6 June 2008 रोजी पाहिले. 
 10. a b Average Conditions, London, United Kingdom. British Broadcasting Corporation. 2008-10-28 रोजी पाहिले.  चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "AverageWeatherLondon" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
 11. ^ London air pollution 'worst in Europe'. The Guardian. 2010-06-25. 2010-06-26 रोजी पाहिले. 
 12. ^ "August 2003 — Hot spell". Met Office. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 2011-02-28 रोजी मिळविली). 
 13. ^ "Met Office: Climate averages 1971-2000". Met Office. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 2011-02-28 रोजी मिळविली). 
 14. ^ साचा:Cite document साचा:WebCite
 15. a b London is twinned with New York, Moscow and Berlin. "Interesting Facts About London". insideguide to London. 27 July 2011 रोजी पाहिले. See Fact 2 by Big Ben photo.
 16. ^ "Friendship agreement to be signed between London and Delhi". Mayor of London. 25 July 2002. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 19 May 2011 रोजी मिळवली). 23 February 2010 रोजी पाहिले. 
 17. ^ "Twinning agreements". Making Joburg an entry point into Africa. City of Johannesburg. 28 August 2009 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 18. ^ Barfield, M (March 2001). "The New York City-London sister city partnership" (PDF). Greater London Authority. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 22 January 2010 रोजी मिळविली). 26 October 2009 रोजी पाहिले. 
 19. ^ "Shanghai Foreign Affairs". Shfao.gov.cn. 27 July 2009. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 19 May 2011 रोजी मिळवली). 23 May 2010 रोजी पाहिले. 

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: