ग्लोब थिएटर हे इंग्लंडच्या लंडन शहरातील नाट्यगृह होते. हे नाट्यगृह १५९९मध्ये विल्यम शेक्सपियरची नाटकमंडळी लॉर्ड चेंबरलेन्स मेन ने साउथवार्क भागात थेम्स नदीच्या दक्षिण तीरावर बांधले होते.

ग्लोब थियेटर
स्थान मेडन लेन (आता पार्क स्ट्रीट), साउथवार्क, लंडन, इंग्लंड
गुणक 51°30′24″N 00°5′41″W / 51.50667°N 0.09472°W / 51.50667; -0.09472
पुनर्बांधणी १६१४
बंद झाले १६४२
पाडले १६४४-४५
मालक लॉर्ड चेंबरलेन्स मेन
१६१६मध्ये ग्लोब (उजवीकडे) आणि बेर गार्डन (डावीकडे)

हे नाट्यगृह २९ जून, १६१३ रोजी आगीत नष्ट झाले. त्याच जागेवर दुसरे ग्लोब थिएटर जून, १६१४मध्ये बांधले गेले. हे नाट्यगृह १६४२ मध्ये लंडनमधील सगळी नाट्यगृहे बंद होई पर्यंत खुले होते.

१६४७मध्ये दुसरे ग्लोब थिएटर

येथे शेक्सपियरची नाटके तसेच बेन जॉन्सन, थॉमस डेकर आणि जॉन फ्लेचर यांची सुरुवातीची कामे येथेच सादर झाली. []

पार्क स्ट्रीट वरून दिसणारी मूळ ग्लोब थिएटरची जागा

१९९७मध्ये येथून २३० मी अंतरावर या नाट्यगृहाची आधुनिक पुनर्रचना शेक्सपियर्स ग्लोब नावाने झाली. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Fact Sheet: The First Globe". Teach Shakespeare (इंग्रजी भाषेत). Shakespeare's Globe. 4 December 2015. 27 January 2023 रोजी पाहिले.
  2. ^ Measured using Google Earth