लंडन आय (इंग्लिश: London Eye) हा लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा (जायंट व्हील/फेरिस व्हील) आहे. थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय हे युनायटेड किंग्डममधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ व लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी सुमारे ३५ लाख पर्यटक भेट देतात.

थेम्स नदीकाठावरील लंडन आय

१३५ मीटर उंचीचा हा पाळणा ३१ डिसेंबर १९९९ रोजी खुला करण्यात आला. ह्याच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी पाउंड इतका खर्च आला.


गॅलरी

संपादन
लंडन आयवरून टिपलेले लंडन शहराचे विस्तृत चित्र.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

51°30′12″N 0°07′11″W / 51.5033°N 0.1197°W / 51.5033; -0.1197