उत्तर समुद्र
समुद्र
उत्तर समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. हा समुद्र उत्तर युरोपात ग्रेट ब्रिटन, स्कॅंडिनेव्हिया, बेल्जियम व नेदरलँड्स देशांच्या मधे स्थित आहे. उत्तर समुद्र अटलांटिक महासागरासोबत दक्षिणेला इंग्लिश खाडी तर उत्तरेला नॉर्वेजियन समुद्राद्वारे जोडला गेला आहे. उत्तर समुद्र ९७० किलोमीटर (६०० मैल) लांब व ५८० किलोमीटर (३६० मैल) रूंद असून त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ७,५०,००० चौरस किमी (२,९०,००० चौ. मैल) इतके आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- संक्षिप्त माहिती Archived 2016-10-05 at the Wayback Machine.