फ्लीट स्ट्रीट इंग्लंडच्या लंडन शहरातील एक रस्ता आहे. हा रस्ता लंडन आणि वेस्टमिन्स्टर शहरांच्या सीमेवर असलेल्या टेम्पल बारपासून ते लंडन वॉल आणि फ्लीट नदीच्या मुखाशीअसलेल्या लुडगेट सर्कसपर्यंत पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो.

या रस्त्याला रोमन काळापासून महत्त्व आहे. मध्ययुगात या रस्त्यावर अनेक व्यवसाय उभे झाले. येथे ज्येष्ठ धर्मगुरुंची घरेही होती. १६व्या शतकाच्या सुरुवातीस हा रस्ता मुद्रण आणि प्रकाशनगृहांमुळे ओळखला जाऊ लागला. २०व्या शतकापर्यंत, बहुतेक ब्रिटिश राष्ट्रीय वृत्तपत्रांची मुख्य कार्यालये येथे होती. १९८० च्या दशकात बरेचशी वृत्तपत्रे इतर ठिकाणी स्थलांतरित झाली तरी उजूनही पूर्वीच्या काही वृत्तपत्र इमारती जतन केल्या गेल्या आहेत. फ्लीट स्ट्रीट हा शब्द ब्रिटिश पत्रकारिते साठी एक समानार्थी शब्द आहे. येथील अनेक पब, जेथे पूर्वी पत्रकार गर्दी करीत, अजूनही लोकप्रिय आहेत.

फ्लीट स्ट्रीटची पाटी
१८९०मध्ये फ्लीट स्ट्रीट

संदर्भ

संपादन