चेल्सी (लंडन)
चेल्सी हे इंग्लंडच्या लंडन शहराच्या पश्चिम भागातील एक उच्चभ्रू उपनगर आहे. हे चेरिंग क्रॉसच्या नैऋत्येस सुमारे २.५ मैल (४ किमी) अंतरावर थेम्स नदीच्या उत्तर तीरावर आहे.
इ.स. १९०० मध्ये चेल्सी हे एक मेट्रोपॉलिटन बरो झाले आणि नंतर हे केन्सिंग्टनच्या मेट्रोपॉलिटन बरोमध्ये विलीन झाले. १९६५मध्ये ग्रेटर लंडनच्या निर्मितीनंतर केन्सिंग्टन आणि चेल्सीचा रॉयल बरो तयार झाला. चेल्सीमध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकन लोक राहतात. येथील ६.५३% व्यक्ती अमेरिकेत जन्मलेल्या आहेत.