ग्रेटर लंडन प्राधिकरण

(ग्रेटर लंडन ऑथॉरिटी या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रेटर लंडन अथॉरिटी (जीएलए) तथा सिटी हॉल ही इंग्लंडमधील ग्रेटर लंडन महानगराची प्रादेशिक प्रशासन संस्था आहे. यात कार्यकारी महापौर (सध्या सादिक खान ) आणि २५-सदस्यीय लंडन असेंब्ली अशा दोन शाखांमध्ये विभागलेली आहे. हे एकमेकांवर नियंत्रण आणि संतुलन ठेवतात. मे २०१६ पासून, दोन्ही शाखा लंडन मजूर पक्षाच्या नियंत्रणाखाली आहेत. या प्राधिकरणाची स्थापना २००० मध्ये घेतलेल्या कौलानंतर करण्यात आली होती. ग्रेटर लंडन अथॉरिटी ऍक्ट १९९९ आणि ग्रेटर लंडन ऑथॉरिटी ऍक्ट २००७ द्वारे या संस्थेला अधिकार प्राप्त झाले आहेत.

ही संस्था लंडनमधील वाहतूक, पोलिस, आर्थिक विकास आणि अग्निशमन आणि आपत्कालीन नियोजन यांचा कारभार बघते. यांत ट्रान्सपोर्ट फॉर लंडन, पोलिसिंग आणि गुन्हेगारीसाठी महापौर कार्यालय आणि लंडन अग्निशमन आयुक्त अशा तीन उपसंस्थांद्वारे सेवा पुरवते.

जुलै २००२ ते डिसेंबर २०२१ दरम्यानचे साउथवार्कमधील सिटी हॉल हे ग्रेटर लंडन अथॉरिटीचे मुख्यालय होते.

जीएलएची जबाबदारी असलेल्या क्षेत्रांमध्ये वाहतूक, पोलिसिंग, अग्निशमन आणि बचाव, विकास आणि धोरणात्मक नियोजन यांचा समावेश होतो. जीएलए स्वतः कोणतीही सेवा थेट पुरवत नाही.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Police Reform and Social Responsibility Act 2011 (Section 1)". UK Legislation. 28 September 2011 रोजी पाहिले.