वॉक्सहॉल ब्रिज

(वॉक्सहॉल पूल या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉक्सहॉल पूल हा इंग्लंडची राजधानी लंडन शहरातील थेम्स नदीवरचा एक पूल आहे. लोखंड आणि ग्रॅनाइट दगडांनी बनविलेला हा पूल मध्य लंडनमधील नदीच्या दक्षिणतीरावरील वॉक्सहॉल आणि उत्तर तीरावरील पिम्लिको भागांना जोडतो. हा पूल १९०६मध्ये बांधला गेला. त्यापूर्वी याच्या शेजारीच असलेला पूल पाडून हा बांधला गेला. जुन्या पुलाचे नाव रीजंट पूल होते पण मध्यंतरी ते बदलून वॉक्सहॉल पूल केले गेले. हा जुना पूल १८०९-१६ दरम्यान बांधला गेला होता.

२००९मध्ये वॉक्सहॉल पूल

हा पूल बांधला जाण्यापूर्वी येथून फेरीद्वारे नदी पार करता येत असे.

या पूलाजवळ रिव्हर एफ्रा ही नदी थेम्सला मिळत असे. आता एफ्रा नदी पूर्णपणे बंदिस्त असून त्याच्या पात्राचा गटार म्हणून वापर होते.

१८२९ मध्ये रीजंट/व्हॉक्सहॉल ब्रिज
१८४७ मध्ये वॉक्सहॉल ब्रिज आणि नाइन एल्म्स स्टेशन
इफ्रा नदीचे थेम्समध्ये मिळणारे पात्र

संदर्भ आणि नोंदी

संपादन