युरोस्टार ही युरोपमधील लंडन शहराला पॅरिसब्रसेल्स शहरांसोबत जोडणारी दृतगती प्रवासी रेल्वे आहे. युरोस्टारच्या सर्व रेल्वेगाड्या इंग्लिश खाडीच्या खालून खणलेल्या चॅनल टनेलमधून धावतात. लंडनमधे सेंट पॅन्क्रास, पॅरिसमध्ये गार द्यू नॉर तर ब्रसेल्समध्ये ब्रसेल्स-दक्षिण ही युरोस्टारचे टर्मिनल स्थानके आहेत. १९९४ साली सुरू झालेली युरोस्टार कंपनी २००९ सालापर्यंत इंग्लंड, फ्रान्सबेल्जियम देशांच्या राष्ट्रीय रेल्वे कंपन्यांनी एकत्रितपणे चालवलेला उपक्रम होता. जानेवारी २०१० पासून युरोस्ट्रारचा ताबा युरोस्टार इंटरनॅशनल नावाच्या नवनिर्वाचित कंपनीकडे देण्यात आला.

लंडनच्या वॉटर्लू स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या युरोस्टार गाड्या

३०० किमी प्रति तास इतक्या वेगाने धावणाऱ्या युरोस्टारसाठी स्वतंत्र लोहमार्ग राखून ठेवण्यात आले आहेत. फ्रान्समध्ये टीजीव्ही रेल्वेचे काही लोहमार्ग युरोस्टारसाठी वापरले जातात. सध्या लंडन-पॅरिस दरम्यान रोज १७ तर लंडन-ब्रसेल्स दरम्यान रोज ११ युरोस्टार गाड्या धावतात. तसेच फ्रान्समधील इतर पर्यटनस्थळांपर्यंत देखील काही हंगामी गाड्या धावतात.


बाह्य दुवे संपादन