चॅनल टनेल
चॅनल टनेल किंवा खाडीखालचा बोगदा (इंग्लिश: Channel Tunnel; फ्रेंच: Le tunnel sous la Manche) हे इंग्लंडच्या केंट काउंटीला फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशासोबत जोडणारे इंग्लिश खाडीच्या खाली बांधलेले ५०.५ किमी लांबीचे रेल्वे भुयार आहे. ह्या भुयाराच्या एकूण लांबीपैकी ३७.९ किमी अंतर पाण्याखाली आहे. १९९४ साली बांधून पूर्ण झालेल्या ह्या भुयारामुळे लंडन व पॅरिस ही युरोपामधील दोन सर्वात मोठी शहरे द्रुतगती रेल्वेने जोडली गेली आहेत. युरोस्टार ही वाहतूक कंपनी लंडन ते पॅरिस व ब्रसेल्स दरम्यान जलद प्रवासी वाहतूक सेवा पुरवते.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |