मुख्य मेनू उघडा


मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. मलेशियामध्ये वेस्टमिन्स्टर धर्तीवरील संसदीय लोकशाही असून सत्तेच्या सर्वोच्चपदी यांग दी-पेर्तुआन आगोंग (राजा) व कार्यकारी प्रमुखपदी पंतप्रधान असतात.

मलेशिया
Malaysia
मलेशियाचा ध्वज मलेशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Bersekutu Bertambah Mutu
(एकी हेच बळ)
राष्ट्रगीत: नगाराकू (माझा देश)
मलेशियाचे स्थान
मलेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी पुत्रजय, क्वालालंपूर
सर्वात मोठे शहर क्वालालंपूर
अधिकृत भाषा मलाय
सरकार संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख अब्दुल हलीम
 - पंतप्रधान नजीब रझाक
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट ३१, इ.स. १९५७ (युनायटेड किंग्डमपासून)
सप्टेंबर १६, इ.स. १९६३(सबा, सारावाक, सिंगापूर यांसमवेतच्या संघराज्यापासून) 
क्षेत्रफळ
 - एकूण ३२९,८५४ किमी (६७वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.३
लोकसंख्या
 - २००९ २,८३,१०,००० (४३वा क्रमांक)
 - घनता ८५.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३५७.९ अब्ज अमेरिकन डॉलर (२९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १४,४०० अमेरिकन डॉलर (५७वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२००७) ०.८२९[१] (उच्च) (६६ वा)
राष्ट्रीय चलन मलेशियन रिंगिट (MYR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मलेशियन प्रमाणवेळ (MST) (यूटीसी+०८:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ MY
आंतरजाल प्रत्यय .my
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६०
राष्ट्र_नकाशा

धर्मसंपादन करा

मलेशिया हा मुस्लिम देश आहे कारण येथे इस्लामला देशाचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता मिळालेली आहे. परंतु सहिष्णुता धोरणानुसार येथे बौद्ध विहार, चर्च, हिंदू मंदिर असण्याबाबतची परवानगी आहे.

धर्म
  1. ६३.३% - मुस्लिम (सुन्नी)
  2. १९.८% बौद्ध
  3. ९.२% ख्रिस्ती
  4. ६.२% हिंदू
  5. ३.४% इतर
 
मलेशियातील बटु गुहा (बटु केव्हज) येथे मुरुगन या देवतेची ही प्रचंड मूर्ती.
 
मलेशियातील बटु गुहा (बटु केव्हज) येथील महाप्रचंड नैसर्गिक गुहेतील मंदिर.

भूगोलसंपादन करा

जमिनीच्या क्षेत्रफळानुसार ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रपफळाचा मलेशिया जगात ६६ व्या क्रमांकाचा मोठा देश असून २.८ कोटी लोकसंख्येसह जगात ४३ व्या क्रमांकावर आहे. याच्या पश्चिमेस थायलंड, पूर्वेस इंडोनेशियाब्रुनेई हे देश असून दक्षिणेस जोहोर सामुद्रधुनीवरील पुलाने जोडला गेलेला सिंगापूर आहे. व्हिएतनामफिलिपिन्स या देशांशी मलेशियाच्या सागरी हद्दी भिडल्या आहेत.

राजकीय विभागसंपादन करा

मलेशियात १३ राज्ये व ३ संघशासित प्रदेश आहेत.

मोठी शहरेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: