विमानतळ(विमानाचा थांबा)(फ्रेंच:Aéroport, जर्मन:Flughafen, स्पॅनिश:Aeropuerto, इंग्लिश:Airport मराठीत उच्चार व लिखाण- एअरपोर्ट) :एक दळणवळणाचे स्थान/ठिकाण किंवा निश्चित मानव नियंत्रीत ठिकाण जे विमान उड्डाणाकरीता (निर्गमन) व उतरविण्याकरीता (आगमन) वापरले जाते. विमानाने आकाशात भरारी मारण्यासाठी व उतरण्यासाठी ज्या विशेष तांत्रिक सोयीसुविधा आवश्यक असतात त्या एका व्यावसायिक विमानतळावर उपलब्ध असतात. मोठी विमानतळे प्रवाशांच्या आगमन व निर्गमनाकरीता तसेच सामान व मालाच्या वाहतूकीकरता देखील वापरली जातात.मोठ्या विमानतळांवर विमानांच्या निर्वहन,बिघाड-दुरुस्तीइंधन भरण्याची सोय अशा अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केलेल्या असतात.

फ्रँकफर्ट विमानतळ

विमानतळावर विमान-उड्डाणासाठी व उतरविण्यासाठी आवश्यक असा सुयोग्य रस्ता आखलेला असतो त्यास धावपट्टी असे संबोधतात.हि धावपट्टी त्या त्या विमानतळाच्या वाहतू़क व वापरावर आधारीत लांबीची तसेच आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सुनिश्चित केलेली असते.जगातील पहिले नागरी विमानतळ अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील न्युजर्सी राज्यातील नेवार्क (Newark)या ठिकाणी बांधल्या गेले.

जगातील सर्वात वर्दळीचे विमानतळ

संपादन

२०१४ साली जगातील खालील विमानतळांनी सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक केली.

क्रम विमानतळ स्थान देश कोड
(IATA/ICAO)
एकूण
प्रवासी
क्रम
बदल
%
बदल
1.   हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ अटलांटा, जॉर्जिया अमेरिका ATL/KATL 96,199,400 1.8%
2.   बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ बीजिंग चीन PEK/ZBAA 84,004,178 1.4%
3.   लंडन-हीथ्रो हिलिंग्डन, लंडन युनायटेड किंग्डम LHR/EGLL 73,371,195 1.4%
4.   हानेडा विमानतळ तोक्यो जपान HND/RJTT 71,639,669 5.6%
5.   लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया अमेरिका LAX/KLAX 70,622,212 1 6.3%
6.   दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दुबई संयुक्त अरब अमिराती DXB/OMDB 70,475,636 1 6.2%
7.   ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ शिकागो, इलिनॉय अमेरिका ORD/KORD 70,075,204 2 4.2%
8.   चार्ल्स दि गॉल विमानतळ पॅरिस, इल-दा-फ्रान्स फ्रान्स CDG/LFPG 63,813,756 2.8%
9.   डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ, टेक्सास अमेरिका DFW/KDFW 63,522,823 5.5%
10.   हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ हाँग काँग चीन HKG/VHHH 63,418,000 1 5.8%
11.   फ्रांकफुर्ट विमानतळ फ्रांकफुर्ट, हेसेन जर्मनी FRA/EDDF 59,566,132 1 2.6%
12.   इस्तंबूल अतातुर्क विमानतळ इस्तंबूल Turkey IST/LTBA 56,954,790 6 11.1%
13.   सुकर्णो-हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ जाकार्ता, बांतेन इंडोनेशिया CGK/WIII 57,493,243 3 5.3%
14.   क्वांगचौ बैयुन आंतरराष्ट्रीय विमानतळ क्वांगचौ, क्वांगतोंग चीन CAN/ZGGG 56,050,262 2 4.1%
15.   ॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल ॲम्स्टरडॅम, नूर्द-हॉलंड नेदरलँड्स AMS/EHAM 54,978,023 1 4.6%
16.   सिंगापूर चांगी विमानतळ चांगी सिंगापूर SIN/WSSS 54,093,070 3 0.7%
17.   डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ डेन्व्हर, कॉलोराडो अमेरिका DEN/KDEN 53,528,960 2 3%
18.   जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ क्वीन्स, न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क अमेरिका JFK/KJFK 53,254,362 1 5.2%
19.   शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ शांघाय चीन PVG/ZSPD 51,661,800 2 7.6%
20.   क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ क्वालालंपूर, सलांगोर मलेशिया KUL/WMKK 48,918,988 3.0%
21.   शार्लट-डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ शार्लट, नॉर्थ कॅरोलिना अमेरिका CLT/KCLT 47,258,910 1 2.4%
22.   सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ सॅन फ्रान्सिस्को अमेरिका SFO/KSFO 47,074,162 5.4%
23.   सुवर्णभूमी विमानतळ बँकॉक थायलंड BKK/VTBS 46,423,352 6 5.7%
24.   इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ इंचॉन दक्षिण कोरिया ICN/RKSI 45,518,710 1 9.7%
25.   मॅककॅरान आंतरराष्ट्रीय विमानतळ लास व्हेगास, नेव्हाडा अमेरिका LAS/KLAS 42,869,517 1 2.4%
26.   माद्रिद–बाराहास विमानतळ माद्रिद स्पेन MAD/LEMD 41,833,374 3 5.3%
27.   जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ ह्युस्टन, टेक्सास अमेरिका IAH/KIAH 41,251,015 1 2.6%
28.   मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ मायामी, फ्लोरिडा अमेरिका MIA/KMIA 40,941,879 2 0.9%
29.   फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ फीनिक्स, ॲरिझोना अमेरिका PHX/KPHX 40,318,451 2 3.9%
30.   म्युनिक विमानतळ म्युनिक जर्मनी MUC/EDDM 39,700,515 2.7%