क्वांगतोंग
क्वांगतोंग (देवनागरी लेखनभेद: ग्वांगदोंग, क्वांगतुंग ; सोपी चिनी लिपी: 广东省; पारंपरिक चिनी लिपी: 廣東省; पिन्यिन: Guǎngdōng Shěng) हा चीन देशाच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रांत आहे. जानेवारी, इ.स. २००५ साली हनान व स-च्वान प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले क्वांगचौ व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले षेंचेन, ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात.
क्वांगतोंग 广东省 | |
चीनचा प्रांत | |
![]() क्वांगतोंगचे चीन देशामधील स्थान | |
देश | ![]() |
राजधानी | क्वांगचौ |
क्षेत्रफळ | १,७७,९०० चौ. किमी (६८,७०० चौ. मैल) |
लोकसंख्या | ९,५४,४०,००० |
घनता | ४६७ /चौ. किमी (१,२१० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-GD |
संकेतस्थळ | http://www.gd.gov.cn/ |
भूगोल संपादन
दक्षिण चीन समुद्राच्या किनारी वसलेल्या क्वांगतोंगास एकूण ४,३०० कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. दक्षिण चीन समुद्रास येऊन मिळताना मोती नदीने निर्मिलेला त्रिभुज प्रदेश हे या किनारपट्टीचे एक महत्त्वाचे भूशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. पूर्व नदी, उत्तर नदी आणि पश्चिम नदी या मोती नदीच्या उपनद्या अनेक प्रवाहांनी या त्रिभुज प्रदेशात रित्या होतात. यामुळे मोती नदीच्या त्रिभुजप्रदेशात अनेक छोटी छोटी बेटे निर्माण झाली आहेत.
क्वांगतोंगाच्या नैऋत्येकडील भागात लैचौ द्वीपकल्प असून तेथे काही निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. प्रांताच्या उत्तरेस "नान पर्वतरांगा" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगांचा समूह आहे.
राजकीय विभाग संपादन
क्वांगतोंग प्रांत एकूण २१ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे.
क्वांगतोंगचे राजकीय विभाग' |
---|
बाह्य दुवे संपादन
- क्वांगतोंग शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |