दक्षिण चीन समुद्र
समुद्र
दक्षिण चीन समुद्र (चिनी: 南海 , नान् हाय ; 南中國海 , नान् चोंग्कुओ हाय ; तागालोग: Dagat Timog Tsina, दागात तिमोग त्सिना ; भासा मलायू, भासा इंडोनेशिया: Laut Cina Selatan, लाउत चिना सलातान ;) हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. चीन, तैवान, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर व व्हियेतनाम हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत.
नैसर्गिक वायू आणि तेल यांचे समृद्ध साठे या समुद्राखाली असल्याने चीन देश या जवळजवळ संपूर्ण समुद्रावर हक्क सांगत आहे. स्पार्ट्ली द्विपसमूहातील अनेक छोट्या बेटांवर भराव घालून चीनने तिथे विमानाच्या धावपट्ट्या, रडार यांचे आरोपण केले आहे. त्यामुळे चीन आणि सर्व शेजारी देश (तसेच अमेरिका) यामधील वाद वाढला आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- दक्षिण चीन समुद्रावरील आभासी ग्रंथालय (इंग्लिश मजकूर)