दुबई

संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर


दुबई (अरबी: دبي) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाची अमिरात आहे.[१] दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. अबु धाबी व दुबई ह्या दोन अमिरातींना सर्वाधिक राजकीय महत्त्व असून देशाच्या विधिमंडळामध्ये त्यांना नकाराधिकार उपलब्ध आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील सर्वात मोठे शहर असलेल्या दुबईची लोकसंख्या २०१३ साली सुमारे २१ लाख होती.

दुबई
دبي
संयुक्त अरब अमिरातीमधील शहर
ध्वज
दुबईचे संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान

गुणक: 24°57′00″N 55°20′00″E / 24.95000°N 55.33333°E / 24.95000; 55.33333

देश संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
स्थापना वर्ष ९ जून १८३३
क्षेत्रफळ ४,११४ चौ. किमी (१,५८८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर २१,०६,१७७
  - घनता ५२४.७ /चौ. किमी (१,३५९ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०४:००
http://www.dm.gov.ae

दुबई हे एक जागतिक शहर असून मध्य पूर्वदक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे.[२] १९६० च्या दशकादरम्यान दुबईची जोमाने वाढ होत असताना येथील खनिज तेल साठ्यांचा शोध लागलेला नव्हता. १९६९ साली येथे तेलविक्रीमधून मिळकतीस सुरुवात झाली परंतु इतर अरबी शहरांप्रमाणे येथील अर्थव्यवस्था संपूर्णपणे खनिज तेलावर कधीच अवलंबून नव्हती. सध्या दुबईच्या एकूण अर्थव्यवस्थेमधील केवळ ५ टक्के हिस्सा तेलविक्रीमधून येतो.[३] दुबईने पश्चिमात्य पद्धतीची अर्थनीती स्वीकारल्यामुळे पर्यटन, बँकिंग, स्थावर मालमत्ता इत्यादी बहुरंगी उद्योगांवर दुबईने लक्ष केंद्रित केले आहे. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत दुबईमध्येच स्थित आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीचा फटका दुबईच्या स्थावर उद्योगाला देखील बसला परंतु त्यामधून दुबई बाहेर येत आहे.[४]

आजच्या घटकेला दुबई मध्यपूर्वेतील सर्वात महागडे तर जगातील २२व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे.[५] २०१४ साली दुबईमधील हॉटेलांचे भाडे जगात दुसऱ्या क्रमांकावर होते (जिनिव्हाखालोखाल). येथील राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा असून ते निवाससाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. परंतु येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या दक्षिण आशियाई कामगार व मजूर वर्गाचे शोषण करून त्यांना अमानुष वागणूक दिल्याच्या वृत्तांमुळे दुबईवर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा देखील आरोप केला जातो.

भूगोल

संपादन

दुबई अमिराती पर्शियन आखाताच्या आग्नेय किनाऱ्यावर अरबी वाळवंटामध्ये समुद्रसपाटीवर वसले आहे. दुबईच्या दक्षिणेला अबु धाबी अमिरात, ईशान्येला शारजा अमिरात तर आग्नेयेला ओमान देश आहेत. दुबईचे मुळ क्षेत्रफळ ३,९९० चौरस किमी (१,५४० चौ. मैल) इतके होते परंतु समुद्र बुजवून येथे अनेक कृत्रिम बेटे बनवण्यात आली आहेत ज्यामुळे दुबईचे आजचे क्षेत्रफळ ४,११० चौरस किमी (१,५९० चौ. मैल) इतके आहे. दुबईमध्ये कोणतीही नदी नाही.

हवामान

संपादन

वाळवंटामध्ये स्थित असल्यामुळे दुबईचे हवामान अत्यंत उष्ण आहे. येथील उन्हाळे प्रखर व दमट असतात. उन्हाळ्यामध्ये येथील सरासरी कमाल तापमान ४१ °से (१०६ °फॅ) तर हिवाळ्यामध्ये सरासरी किमान तापमान १४ °से (५७ °फॅ) असते. येथील वार्षिक पर्जन्यवृष्टीमध्ये वाढ होत असून हल्ली येथे प्रतिवर्षी ९४.३ मिमी (३.७१ इंच) पावसाची नोंद झाली आहे.[६]

दुबई साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 31.6
(88.9)
37.5
(99.5)
41.3
(106.3)
43.5
(110.3)
47.0
(116.6)
46.7
(116.1)
49.0
(120.2)
48.7
(119.7)
45.1
(113.2)
42.0
(107.6)
41.0
(105.8)
35.5
(95.9)
49
(120.2)
सरासरी कमाल °से (°फॅ) 24.0
(75.2)
25.4
(77.7)
28.2
(82.8)
32.9
(91.2)
37.6
(99.7)
39.5
(103.1)
40.8
(105.4)
41.3
(106.3)
38.9
(102)
35.4
(95.7)
30.5
(86.9)
26.2
(79.2)
33.4
(92.1)
सरासरी किमान °से (°फॅ) 14.3
(57.7)
15.4
(59.7)
17.6
(63.7)
20.8
(69.4)
24.6
(76.3)
27.2
(81)
29.9
(85.8)
30.2
(86.4)
27.5
(81.5)
23.9
(75)
19.9
(67.8)
16.3
(61.3)
22.3
(72.1)
विक्रमी किमान °से (°फॅ) 6.1
(43)
6.9
(44.4)
9.0
(48.2)
13.4
(56.1)
15.1
(59.2)
18.2
(64.8)
20.4
(68.7)
23.1
(73.6)
16.5
(61.7)
15.0
(59)
11.8
(53.2)
8.2
(46.8)
6.1
(43)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 18.8
(0.74)
25.0
(0.984)
22.1
(0.87)
7.2
(0.283)
0.4
(0.016)
0.0
(0)
0.8
(0.031)
0.0
(0)
0.0
(0)
1.1
(0.043)
2.7
(0.106)
16.2
(0.638)
94.3
(3.711)
सरासरी पर्जन्य दिवस 5.4 4.7 5.8 2.6 0.3 0.0 0.5 0.5 0.1 0.2 1.3 3.8 25.2
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 65 65 63 55 53 58 56 57 60 60 61 64 59.8
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 254.2 229.6 254.2 294.0 344.1 342.0 322.4 316.2 309.0 303.8 285.0 254.2 ३,५०८.७
स्रोत #1: Dubai Meteorological Office[७]
स्रोत #2: climatebase.ru (extremes, sun),[८] NOAA (humidity, 1974–1991)[९]

जनसांख्यिकी

संपादन
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक.
इ.स. १८२२ &0000000000001200.000000१,२००[१०]
इ.स. १९०० &0000000000010000.000000१०,०००[११]
इ.स. १९३० &0000000000020000.000000२०,०००[१२]
इ.स. १९४० &0000000000038000.000000३८,०००[१०]
इ.स. १९६० &0000000000040000.000000४०,०००[१३]
इ.स. १९६८ &0000000000058971.000000५८,९७१[१४]
इ.स. १९७५ &0000000000183000.000000१,८३,०००[१५]
इ.स. १९८५ &0000000000370800.000000३,७०,८००[१६]
इ.स. १९९५ &0000000000674000.000000६,७४,०००[१६]
इ.स. २००५ १२,०४,०००
इ.स. २०१३ २१,०६,१७७
c-गणना; e-अंदाज

२००९ सालच्या जनगणनेनुसार दुबईची लोकसंख्या १७,७१,००० इतकी होती ज्यामध्ये १३,७०,००० पुरुष व ४,०१,००० महिला होत्या. दुबईच्या लोकसंख्येपैकी केवळ १०-१५ टक्के लोकच स्थानिक अमिराती वंशाचे आहेत व उर्वरित ८५ टक्के रहिवासी बाहेरून स्थानांतरित होऊन येथे स्थायिक झालेले आहेत. स्थानांतरित लोकांपैकी बव्हंशी लोक आशियाई आहेत ज्यांपैकी ५३ टक्के लोक भारतीय आहेत.

 •   − 53%
 •   − 17%
 •   − 13.3%
 •   − 7.5%
 •   − 2.5%
 •   − 1.5%
 •   − 0.3%
 • इतर − 5.7%

अरबी ही दुबईमधील राष्ट्रीय व राजकीय भाषा आहे व दैनंदिन वापरासाठी इंग्लिशचा दुसरी भाषा म्हणून उपयोग होतो. येथील बहुसंख्य रहिवासी विदेशी वंशाचे असल्यामुळे खालील भाषा दुबईमध्ये वापरात आहेत ज्यांमध्ये अनेक भारतीय भाषांचा समावेश आहे. हिंदी-उर्दू (किंवा हिंदुस्तानी), फारसी, मल्याळम, पंजाबी, पश्तो, बंगाली, सिंधी, बलुची, तुळू,[१७] तामिळ, कन्नड, सिंहला, मराठी, तेलुगू, टागालोगचिनी.[१८]

संयुक्त अरब अमिरातीच्या संविधानानुसार इस्लाम हा दुबईमधील राजकीय धर्म आहे. येथील बहुतेक सर्व मशिदींना सरकारी अनुदान मिळते व सर्व मुस्लिम धर्मगुरूंना सरकारकडून वेतन मिळते. इस्लामव्यतिरिक्त ख्रिश्चनहिंदू ह्या दोन धर्मांचे रहिवासी येथे मोठ्या संख्येने आहेत.

वाहतूक

संपादन
 
दुबईमधील रस्ते

रोड्स ॲन्ड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी (Roads and Transport Authority (RTA)) नावाची सरकारी संस्था दुबईमधील वाहतूक व परिवहनासाठी जबाबदार आहे. २००९ साली दुबईमध्ये १०,२१,८८० खाजगी मोटार कार् होत्या व केवळ ६ टक्के रहिवासी सार्वजनिक परिवहनाचा वापर करीत होते. दुबई हे मध्य पूर्वेमधील महामार्गांवर सर्वाधिक गर्दी असलेले शहर आहे. वाहतूक सुधारण्यासाठी व सार्वजनिक परिवहनाचा वापर वाढवण्यासाठी येथे अनेक नवे बसमार्ग चालू करण्यात आले आहेत व अनेक ठिकाणी वातानुकुलित बसथांबे बांधण्यात आले आहेत. २००९ साली चालू झालेली दुबई मेट्रो ही जगातील सर्वाधिक लांबीची संपूर्ण स्वयंचलित, विनाचालक जलद परिवहन प्रणाली आहे. एकूण ७४.६ किमी लांबीच्या दोन मार्गांवर ४९ वातानुकुलित स्थानके आहेत. दुबई मेट्रो ही अरबी द्वीपकल्पामधील पहिली शहरी वाहतूक सेवा आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असून एमिरेट्स, फ्लायदुबई ह्या दुबईमधील प्रमुख विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे. २०१४ साली ७ कोटी प्रवाशांनी ह्या विमानतळाचा वापर केला. सध्या दुबई विमानतळावरून जगातील १४२ शहरांना वाहतूकसेवा पुरवण्यात येते.

फुटबॉलक्रिकेट हे दुबईमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने आपले मुख्यालय २००५ साली लंडनहून दुबईला हलवले. पाकिस्तान देशामध्ये सुरक्षा परिस्थिती बिकट असल्यमुळे पाकिस्तान क्रिकेट संघ आपले बहुतेक आंतरराष्ट्रीय सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधून खेळतो. २०१४ इंडियन प्रीमियर लीगमधील सुरुवातीचे अनेक सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आले होते ज्यांपैकी काही दुबईमध्ये देखील आयोजीत करण्यात आले होते.

संदर्भ आणि नोंदी[१९]

संपादन
 1. ^ "United Arab Emirates: metropolitan areas". 2012-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2009 रोजी पाहिले.
 2. ^ "The 2008 Global Cities Index". Foreign Policy. 15 October 2008. 2010-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 April 2010 रोजी पाहिले.
 3. ^ DiPaola, Anthony (2010-09-28). "Dubai gets 2% GDP from oil". Bloomberg. September 2014 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 4. ^ "Dubai witnessed stable financial recovery - report". 2012-06-28. 2015-10-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-12 रोजी पाहिले.
 5. ^ Lucy Barnard (2013-03-06). "Cost of living in Dubai rising rapidly - The National". 2013-03-12 रोजी पाहिले.
 6. ^ "Climate in Dubai across the year. Dubai Meteorological office". 2013-04-20 रोजी पाहिले.
 7. ^ "Climate". 20 December 2008 रोजी पाहिले.
 8. ^ "Dubai, Emirates". 10 February 2013 रोजी पाहिले.
 9. ^ "Climate Normals for Dubai". 10 February 2013 रोजी पाहिले.
 10. ^ a b Karin, Luiza (September 1999). "Modernity and tradition in Dubai architecture by Luiza Karim". 19 April 2010 रोजी पाहिले.
 11. ^ Hadjari, Karim. "3D Modelling and Visualisation OF Al Baskita in Dubai IN Dubai, United Arab Emerites" (PDF). 19 April 2010 रोजी पाहिले. |archive-url= is malformed: timestamp (सहाय्य)
 12. ^ "Tourism in Dubai" (PDF). 19 April 2010 रोजी पाहिले. |archive-url= is malformed: timestamp (सहाय्य)
 13. ^ Lahmeyer, Jan (2001). "The United Arab Emigrates – Historical demographical data of the urban centers". 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 April 2010 रोजी पाहिले.
 14. ^ Heard-Bey, Frauke. "The Tribal Society of the UAE and its Traditional Economy" (PDF). 2011-04-28 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 19 April 2010 रोजी पाहिले.
 15. ^ "Census 2005 U.A.E." 2010-05-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 April 2010 रोजी पाहिले.
 16. ^ a b Younes, Bassem. "Roundabouts vs. Intersections: The Tale of Three UAE Cities" (PDF). 19 April 2010 रोजी पाहिले.
 17. ^ "Nama Tuluveru all set to entertain UAE with Rangabhoomi's 'Kaala Chakra'". daijiworld.com.
 18. ^ "Languages spoken in Dubai". 2013-04-20 रोजी पाहिले.
 19. ^ Visa Services, UBL. "UAE Visit Visa | Dubai Visa Online - UBL Travels". www.ubltravels.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-01-27. 2020-01-18 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: