हिंदुस्तानी किंवा हिंदी-उर्दू ही उत्तर भारतपाकिस्तान देशांमधील एक प्रमुख भाषा आहे. ह्या भाषेची दोन आधुनिक रूपे आहेत: हिंदीउर्दू.

हिंदुस्तानी
हिन्दुस्तानी • ہندوستانی
स्थानिक वापर भारत, पाकिस्तान
प्रदेश दक्षिण आशिया
लोकसंख्या ४९ कोटी (२००६)
बोलीभाषा खडीबोली, दक्खनी, कौरवी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी देवनागरी, फारसी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत (हिंदीउर्दू)
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान (उर्दू)
भाषा संकेत
ISO ६३९-१ hi, ur
ISO ६३९-२ hin, urd
ISO ६३९-३ hin[मृत दुवा] - हिंदी
urd - उर्दू
1842 मध्ये हिंदुस्थानीमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन कराराचे शीर्षक पृष्ठ
न्यू टेस्टामेंटचा पहिला अध्याय हिंदुस्थानी भाषेत प्रकाशित झाला

ह्या दोन्ही भाषा हिंदुस्तानीवरूनच तयार झाल्या असल्या तरीही त्यांचे व्याकरण, शैली, लिप्या इत्यादी वेगवेगळे आहे. उर्दूवर फारसीअरबी भाषांचा तर हिंदीवर संस्कृतचा प्रभाव पडला आहे. भारताच्या फाळणीअगोदर हिंदुस्तानी, हिंदी व उर्दू ह्या सर्व एकच होत्या.