उत्तर भारत हा भारत देशाच्या उत्तर भागातील एक ढोबळ व्याख्या असलेला भौगोलिक प्रदेश आहे. हिंदी ही उत्तर भारतामधील प्रमुख भाषा असून भारतामधील अनेक प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक स्थाने उत्तर भारतामध्ये स्थित आहेत.

उत्तर भारतामधील राज्ये

भारत सरकारच्या व्याखेनुसार उत्तर भारतामध्ये जम्मू व काश्मीर, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्य प्रदेश ह्या राज्यांचा समावेश होतो.