गोवा

भारतातील एक राज्य...

गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरमअरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वदक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ३० मे १९८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला असून गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो, यावरून आपल्याला एक गोष्ट जाणवते,कि गोव्यात अनेक धर्मांचे लोक एकोप्याने राहतात . सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे गोवा हे राज्य आहे.

  ?गोवा
गोंय
भारत
—  राज्य  —
Map

१५° २४′ ०७″ N, ७४° ०२′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३,७०२ चौ. किमी
राजधानी पणजी
मोठे शहर वास्को द गामा
जिल्हे
लोकसंख्या
घनता
१४,५७,७२३ (२५ वे) (२०११)
• ३९०/किमी
भाषा कोकणी,मराठी
गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
न्यायालय मुंबई उच्च न्यायालय -पणजी,गोवा खंडपीठ
स्थापित ३० मे १९८७
विधानसभा (जागा) गोवा विधानसभा (४०)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-GA
संकेतस्थळ: गोवा सरकार संकेतस्थळ
गोवा चिन्ह
गोवा चिन्ह

गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणीमराठी ह्या प्रमुख भाषा असून शेतीमासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळकडधान्य पिकवले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी असून गोव्यात मॅगनीज, लोहबॅाक्साईट ही खनिजे आढळतात.


पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्कोपोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीपर्यंत गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला.

निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे. कावी ही गोमंतकाची कला आहे.

इतिहास

संपादन

नावाचा उगम

संपादन

महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपराष्ट्र’ किंवा ’गोवराष्ट्र’ - (गोपजन; किंवा आभीर जे ब्रज प्रदेशातील होते ) असा केलेला आढळतो.हरिवंश या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण यादव जनांसह या परिसरात आले असा उल्लेख आढळतो. ईश्वरसेन आभीर याने ३ ऱ्या शतकात सातवाहनांचा पराभव करून महाराष्ट्र व गोव्यावर आधिपत्य प्रस्थापित केले हे आभीर म्हणजेच महाभारत कालीन यादव होय ब्रज प्रदेशापासून दक्षिणेपर्यंत अनेक वसाहती स्थापन करून त्यांनी त्याला आभीर देश ,गोपराष्ट्र असे नामकरण केलेले दिसते. नाशिक परिसर कान्हदेश म्हणून ओळखला जातो. स्कंदपुराण, हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपकपुरी’ किंवा ’गोपकपट्टणम’ असा केला आहे.|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरमअरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे.पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्कोपोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. याकाळात येथे पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले. येथे ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वदक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

राज्य स्थापना दिन

संपादन

३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्तकरेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.[]

भूगोल

संपादन

संगीत

संपादन

गोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी ग्वाल्हेरला जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात बांदोडे या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, पेडणे महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी.

सन १८७० च्या सुमारास गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली.

गोव्यातील रेल्वे स्टेशने

संपादन
  • करंजोळ (Caranzol)
  • करंबोळी (Carambolim)
  • करमाळी (Karmali)
  • कळंब (Kolamb)
  • कळें (Calem)
  • कुळे (Kulem)
 
दुधसागर धबधबा
 
दुधसागर धबधबा
 
दुधसागर धबधबा
 
दुधसागर धबधबा
 
दुधसागर धबधबा
  • काणकोण (Canacona)
  • कासुएं(Canasuaim)
  • कुडचडें (Curchorem)
  • चांदोर गोवा (Chandorgoa)
  • जुने गोवें (Old Goa)
  • थीवी (Tivim) (Thivim)
  • दाभोळी (Dabolim)
  • दूधसागर (Doodh Sagar) (Dudhsagar)
  • पेडणे (Pernem)
  • बारकें (Barcem)
  • बाली (Bali)
  • मडगाव (Margao) (Margaon)
  • मयें (Maem) (Mayem)
  • मजोर्डा (Mejorda)
  • म्हापसा (Mapuca)
  • लोलिये (Loliem)
  • वास्को (Vasco)
  • वास्को द गामा(Vasco da Gama)-संभाजीनगर
  • वेर्णा (Verna) (Vernem)
  • सरजोरा (Sarzora)
  • सरौली(Saraulim) (Seraulim)
  • सांवर्डे (Sanvordem)
  • सोनवली (Sonaulim)

गोव्यातील रेल्वे स्टेशने नसलेली गावे

संपादन
  • ओशेल (Oxel)
  • करंजोळ (Caranzol)
  • कळंगुट (Calangute)
  • कांसावली (Cansaulim)
  • कुट्ठाळी (Cortalim)
  • कुडतरी (curtorim)
  • कोळें (Collem/Colem)
  • तळावली (Talaulim)
  • पणजीं (Punjim)
  • पर्वरी (Porvorim)
  • फोंडा तालुका (Ponda)
  • बारदेश (Bardez)
  • मुरगांव (Mormugao), मार्मागोवा, मोर्मुगांव
  • मोले (Mollem/Molem)
  • शापोरा (Chapora)
  • शिवोलीं (Siolim)
  • सांगे तालुका (Sanguem)
  • सावर्डे (Sanvordem)
  • हडफडे (Arpora)
  • हणजुणे (Anjuna)
  • हळदण (Aldona)
  • उगे (Uguem)

जिल्हे

संपादन
हेसुद्धा पाहा: गोव्यामधील जिल्हे

गोव्यात २ जिल्हे आहेत - उत्तर गोवा जिल्हा आणि दक्षिण गोवा जिल्हा.

तालुके

संपादन

गोव्यात १२ तालुके आहेत.

प्रमुख शहरे

संपादन

संस्कृती

संपादन
 
दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात आलेल्या नरकासुराच्या मिरवणुकीतील एक दृश्य (स्थळःम्हापसा)

'गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरमअरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वदक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणीमराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेतीमासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळकडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोहबॅाक्साईट ही खनिजे आढळतात. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. ३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली. येथील जनतेने धार्मिक छळ आणि हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर, दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड, हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंसआणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे हे राज्य आहे. १.गोव्यात गणेश उत्सव,शिमगा हे सण विशेष उत्साहाने साजरे होतात.गणेश चतुर्थीला घराघरात मातीची गणेशमूर्ती आणून तिची पूजा केली जातो. निसर्गात सापडणाऱ्या विविध वनस्पती, फुले, फळे, यांची गणेशाला आवड आहे. त्यातूनच सुंदर संकल्पना निर्माण झाली, ती म्हणजे गणेश चतुर्थीला रानफुले व फळाचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या 'माटोळी'. होळीला गोव्यात 'शिगमा' असे म्हणले जाते.[]

२. गोव्याची ग्रामदेवता सातेरी म्हणजे वारूळ.गोव्यात स्रियांचा धालो किंवा धिल्लो नावाचा उत्सव साजरा होतो.यामधे वारूळाच्या मातीचा गोळा तयार करून भूदेवतेचा पूजाविधी म्हणून सुमारे तीन आठवडे स्रिया त्याभोवती फेर धरून गाणी म्हणतात. जननशक्तीचे प्रतीक म्हणून ही वारूळाची पूजा केली जाते. गोव्यातील अनेक लोककला प्रकारात 'धालो' हा लोकोत्सव प्रकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 'धालो' हा पूर्णपणे स्त्रीप्रधान लोकनाट्यकला प्रकार आहे[].

३. नवस बोलणे, अंगात देवी येणे, देवतेला कौल लावणे, पूजेसाठी नागवेली, नारळ,सुपारी यांचा वापर करणे, मांत्रिक किंवा देवर्षीचा सल्ला असे विधी गोव्यात प्रचलित आहेत. पंचमहाभूतांची पूजाही विशेष प्रचलित दिसते.

४.ग्रामीण देवदेवतांची पूजा करताना भैरोबा, काळभैरव, सिदोबा यांची पूजा केली जाते. रवळनाथ ही क्षेत्रपाल देवता गोव्यात मनोभावे पूजली जाते.

५. लळित,खेळे यांच्याशी साम्य असलेला 'रणमाले' हा नाट्यनृत्य प्रकार गोव्यात प्रचलित आहे. []

६ धालो हा दरवर्षांच्या पौष महिन्यात पौर्णिमेच्या सुमारास हा उत्सव होतो.[]

गोव्यातील मराठी संस्था

संपादन

गोव्यातील मराठीसाठी काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या काही संस्था आहेत. यांतील बहुतेक संस्था सध्या (२०१३ साली) निष्क्रिय असल्यासारख्या आहेत, असा लोकांचा आरोप आहे.

संस्थांची नावे :-

१. गोमंतक मराठी अकादमी

२. मडगावातील गोमंत विद्या निकेतन

३. गोमंतक साहित्य सेवक मंडळ

४. कोकण मराठी परिषद

५. गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा

६. मराठी राजभाषा प्रस्थापन समिती

गोव्यावरील मराठी पुस्तके

संपादन
  • असा हा गोमंतक (माधव गडकरी)
  • गोवा (इंद्रायणी सावकार)
  • गोवा मुक्तिसंग्राम (दुर्गेश परुळकर, डॉ. सच्चिदानन्द शेवडे)
  • गोव्यातील आदिवासी रचना आणि जिवन शैली (देविदास जा. गावकर )
  • गोवा राजकारण आणि पर्रीकर (सद्गुरू पाटील)
  • मराठी रंगभूमी आणि गोमंतकाची देण (भिकू पै आंगले)
  • गोमंतकीय लोकवेदातील महिला लोकगीते - पुरुषप्रधान संस्कृतीत संस्कृती संवर्धनाच्या महान कार्यात येथील स्त्री शक्तीने फार मोठे योगदान दिले आहे. तसेच त्यांनी आपल्या विविध मराठी गीतामधून मराठमोळी संस्कृती जपलेली आहे. लोकवेदाचे एक अतिशय समृद्ध, विलोभनीय आणि अभिन्न अंग म्हणजेच गोव्यातील महिला गीते.[]
  • हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीत पोर्तुगिजांचे आगमन आणि अस्त (कृष्णा शेटकर)

गोव्यावरील इंग्रजी पुस्तके

संपादन
  • Gova a Social History : 1510 -1640 (P.D. Xavier); राजहंस प्रकाशन
  • The Goa Inquisition : The Terrible Tribunal for the East (A.K. Priolkar); राजहंस प्रकाशन
  • The Liberation of Goa : A Participant's View of History (Dr Pundalik D. Gaiytonde); राजहंस प्रकाशन

पर्यटन

संपादन

प्रमुख समुद्रकिनारे

संपादन
  • कोलवा (Colva)
  • दोना पावला (Dona Paula)
  • मिरामार (Miramar)
  • कळंगुट (Calangute)
  • हणजुणे (Anjuna)
  • पाळोळे (Polem)
  • वागातोर (Vegator)
  • हरमल
  • आगोंद
  • बागा
  • मोरजी

अभयारण्ये

संपादन

इतर ठिकाणे

संपादन
निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
  • दूधसागर धबधबा
  • आग्वाद किल्ला
  • मये तलाव (Mayem) (Maem)
  • केसरव्हाळ
  • मोवाचो गुणो
  • नेत्रावली धबधबा

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ दैनिक, पुढारी (३० मे २०१०). "जिज्ञासा". २१३: ६.
  2. ^ गांवकर, विजय (२०१४). हिरवाईची भावस्पंदने. गोवा: निधी. pp. २६.
  3. ^ महांबरे, स्नेहा (2015). गोव्यातील धालो या लोकनाट्य कलाप्रकाराचा चिकित्सक अभ्यास. गोवा: शुभजी. p. 27.
  4. ^ भोसले द.ता., लोकसंस्कृृती बंध अनुबंध,पद्मगंधा प्रकाशन २॰१॰
  5. ^ खेडेकर, विनायक. लोकसरिता. गोवा: कला अकादमी,पणजी. pp. पृ.क्र.107.
  6. ^ मयेकर, आनंद (२००४). गोमंतकीय लोकवेदातील महिला लोकगीते. गोवा: गोमंतक मराठी अकादमी. pp. १.