अरबी समुद्र

अरबी समुद्रतील खनिजतेल क्षेत्राचे. नाव

भारताच्या पश्चिमेला असलेल्या समुद्राला अरबी समुद्र (अरबी भाषा: بحر العرب बह्र अल-अरब; मल्याळम: അറബിക്കടല് , अरबीक्कादल ; कन्नड, तुळू: ಅರಬ್ಬೀ ಸಮುದ್ರ , अरबी समुद्र ; फारसी: دریای عرب ; उर्दू: بحیرہ عرب ; संस्कृत: सिन्धु सागर) असे म्हणतात. या समुद्राच्या पूर्वेस भारत, उत्तरेस पाकिस्तानइराण, तर पश्चिमेस अरबी द्वीपकल्प आहेत. सोमालियातील केप ग्वार्डाफुईपासून कन्याकुमारी (केप कोमोरिन) पर्यंतची काल्पनिक रेषा या समुद्राची दक्षिण सीमा मानली जाते. या समुद्राचे क्षेत्रफळ ३८,६२,००० चौरस कि.मी. आहे.

अरबी समुद्र

या समुद्रातून शेकडो वर्षे भारत, आफ्रिका आणि अरबस्तान दरम्यान व्यापारी जहाजे येजा करीत आहेत. इंग्रज आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांचे मुघलांशी व्यापारी संबंध ह्याच समुद्रातून वाढले. तसेच मराठा नौसेनेने अरबी समुद्रावर गाजवलेले वर्चस्वही खूप अतुलनीय आहे.[१]

किनाऱ्यावरील प्रमुख बंदरेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ "अरबी समुद्र". vishwakosh.marathi.gov.in. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.