ग्वादार बंदर
पाकिस्तानी बंदर
(ग्वादार या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्वादार बंदर पाकिस्तानच्या पश्चिम भागातील बंदर आहे. बलूचिस्तान प्रांतातील ग्वादार शहराजवळ असलेले हे बंदर अरबी समुद्राकाठी इराणच्या सीमेपासून जवळ तर ओमानच्या समोरच्या किनाऱ्यावर आहे.
२०१५ च्या सुमारास चीनने पाकिस्तानला हे बंदर विकसित करण्यास मदत करणे सुरू केले व तेथे आपला कायमस्वरुपी तळ ठोकला. या बंदराद्वारे पाकिस्तान चीन आर्थिक मार्गिकेचा विकास होईल व चीनला अरबी समुद्रात थेट प्रवेश मिळेल.