मुख्य मेनू उघडा

कन्याकुमारी

तमिळनाडू राज्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन केंद्र.


कन्याकुमारी/कन्नियाकुमरि (तमिळ: கன்னியாகுமரி, मल्याळम: കന്യാകുമാരി संस्कृत: कन्याकुमारी) हे एक तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी ह्या जिल्ह्यातील एक प्रमुख गांव आहे तसेच ते तमिळनाडू राज्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन केंद्र देखील आहे. भारताच्या दक्षिण दिशेला असणार्या भूमीचा टोकावर असणारे हे गांव पूर्वी केप कॉमोरीन ह्या नावाने देखील ओळखले जाते.तसेच स्थानिक भाषेत (तमिळ) ह्याचा उच्चार कन्नीकुमरी असा देखील केला जातो. कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रमुख प्रशासनिक केंद्र नागरकोविल (२२ कि.मी.दूर) व केरळची राजधानी तिरुवनंतपुरम (८५ कि.मी.दूर) ही दोन शहरे कन्याकुमारी ह्या गावापासून जवळच आहेत.भारतातील एक प्रमुख पर्यटन केंद्र असलेले कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक, तिरुवल्लुवर पुतळा इत्यादी वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे.

कन्याकुमारी
கன்னியாகுமரி
भारतामधील शहर

Vivekananda Rock Memorial, Kanyakumari.jpg
हिंदी महासागरामधील विवेकानंद स्मारकतिरुवल्लुवर पुतळा
कन्याकुमारी is located in तमिळनाडू
कन्याकुमारी
कन्याकुमारी
कन्याकुमारीचे तमिळनाडूमधील स्थान

गुणक: 8°5′10″N 77°32′40″E / 8.08611°N 77.54444°E / 8.08611; 77.54444

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
जिल्हा कन्याकुमारी जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १०० फूट (३० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २९,७६१
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

कन्याकुमारी रेल्वे स्थानक कन्याकुमारीला भारतामधील सर्व प्रमुख शहरांसोबत जोडते.

चित्रदालन : कन्याकुमारी आणि आजुबाजुचा परिसरसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

बाह्य दुवेसंपादन करा