प्रमोद सावंत
डॉ. प्रमोद सावंत (जन्म: २४ एप्रिल १९७३) हे एक भारतीय राजकारणी व गोव्याचे १३ वे आणि विद्यमान मुख्यमंत्री आहेत. पेशाने आयुर्वेदिक वैद्य असलेल्या सावंतांनी कोल्हापूरमधून वैद्यकीय पदवी मिळवली व पुण्यामधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथून उच्चशिक्षण घेतले.
प्रमोद सावंत | |
विद्यमान | |
पदग्रहण १५ मार्च २०१७ | |
मागील | मनोहर पर्रीकर |
---|---|
गोवा विधानसभा सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण २०१२ | |
मतदारसंघ | साखळी |
जन्म | २४ एप्रिल, १९७३ गोवा, भारत |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
२००८ साली सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर सावंत २०१२ साली भारतीय जनता पक्षाकडून उत्तर गोव्यामधील साखळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. २०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांच्या अकस्मात मृत्यूनंतर भाजपने सावंत ह्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. [गोवा विधानसभा निवडणूक, २०२२|२०२२ गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये]] भारतीय जनता पक्षाने ४० पैकी २० जागांवर विजय मिळवून सत्ता राखली व सावंत मुख्यमंत्रीपदावर राहिले.