इ.स. १९८७
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे |
वर्षे: | १९८४ - १९८५ - १९८६ - १९८७ - १९८८ - १९८९ - १९९० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मार्च ६ - एस.एस. हेराल्ड ऑफ फ्री एंटरप्राइझ ही ब्रिटिश फेरीबोट बेल्जियमच्या झीब्रुग बंदरात बुडाली. १९३ ठार.
- एप्रिल २१ - श्रीलंकेत कोलंबो येथे बॉम्बस्फोट. १०६ ठार.
- मे ९ - पोलंडच्या लॉट एरलाइन्सचे आय.एल.६२एम. जातीचे विमान वॉर्सोच्या विमानतळावर कोसळले. १८३ ठार.
- मे ११ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरात सर्वप्रथम हृदय व फुप्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
- मे १७ - इराकच्या लढाउ विमानाने अमेरिकेच्या यु.एस.एस. स्टार्क या जहाजावर अस्त्रहल्ला केला. ३७ सैनिक ठार, २१ जखमी.
- जुलै ३१ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान.
- ऑगस्ट ९ - ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात १९ वर्षीय ज्युलियन नाइटने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
- ऑगस्ट १६ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
- डिसेंबर २१ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
जन्म
संपादन- एप्रिल १९ - मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.
- सप्टेंबर २८ - हिलरी डफ, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- मे २९ - चौधरी चरण सिंह (लोकदलाचे संस्थापक, भारताचे माजी पंतप्रधान)
- जून ५ - ग. ह. खरे, भारतीय इतिहासतज्ञ.
- सप्टेंबर २९ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती.
- ऑक्टोबर १३ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
- नोव्हेंबर ६ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.