मराठा

महाराष्ट्रातील क्षत्रिय व उच्चवर्णीय जात

मराठा ही महाराष्ट्रातील जात आहे. मराठा जातीच्या कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यासारख्या अनेक पोटजाती सुद्धा आहेत.[२][३] महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. मराठा हा शब्द महारठीक शब्दापासुन तयार झाला आहे.रठीक हे महाराष्ट्रातील पराक्रमी लोक होते .रठीकांना राष्ट्रीक असेही म्हणत होते.त्यावरून महाराष्ट्रीक असा उल्लेख करण्यात आला.महाराष्ट्रीकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे ओळखण्यात आले.राष्ट्रीक लोक कुरू( हरीयाणा),पांचाल(रोहीलखंड) मधुन ई.स.पुर्व ५००ते ६००च्या दरम्यान महाराष्ट्रात आले.येथील नागवंशीय लोकांशी संबंध होऊन ते एकमेकात मिसळले गेले.भारतावरील अनेक परकीय आक्रमणे परतवुन लावतांना मराठा लोकांनी प्राणांची आहुती सदैव दिली आहे.या नांवाने मराठा रेजमेंट भारतीय सैन्यामध्ये आहे. नाणेघाटातील मराठी भाषेतील शिलालेख इ.स.२५० मध्ये गौतमीपुत्र सातकर्णी ह्या सातवाहन राजाने मराठी भाषेत कोरून घेतला आहे .कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे मराठी भाषेत शिलालेख आहे तो इ.स.८५०चा आहे. 'चामुंडराय करवियले .गंगराय सुत्ताले करवियले'असा तो शिलालेख आहे .हा बाहुबलीच्या मुर्तीखाली आहे.

मराठा
एकुण लोकसंख्या
ख़ास रहाण्याची जागा
भारत ध्वज India

महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश

भाषा
[१]
धर्म
हिंदू

लोकसंख्यासंपादन करा

तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे १६.२९ टक्के आणि ७.३४ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% मराठा व १६% कुणबी आहेत.

इतिहाससंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ The Tribes and Castes of Bombay, vol.2, by R. E. Enthoven.
  2. ^ "एक मराठा लाख मराठा people". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.
  3. ^ "India | Facts, Culture, History, Economy, & Geography". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.