मराठा

महाराष्ट्रातील क्षत्रिय व उच्चवर्णीय जात
(शहाण्णव कुळी मराठा या पानावरून पुनर्निर्देशित)

maratha [१]मराठा ही महाराष्ट्रातील जात आहे. मराठा जातीच्या विविध पोटजाती सुद्धा आहेत – , 96 कुळी मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी इत्यादी.[१][२]

महाराष्ट्रासह, गोवा,तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.

शब्द उत्पत्तीसंपादन करा

मराठा या शब्दाचे संस्कृत रुप महाराष्ट्र आहे अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा,रठ्ठा म्हणजे राष्ट्र,रठ्ठा मार देणे,महारथ, महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यन्त शौर्यशाली रणधुरन्धर क्षत्रिय राजबिण्ड्या पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे-

"'एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।' !!

भावार्थ - शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरन्धरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात." या सम्बन्धाने डॉ.भाण्डारकर म्हणतात,"महारथ, महारथी, मरहट्टा व मराठा यांचे संस्कृत रूप महाराष्ट्र असे आहे. अर्थात महाराष्ट्र म्हणजे महारथींचा/महारट्ट्यांचा उर्फ मराठा क्षत्रियांचा देश होय. ख्रिस्ती सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले. विन्ध्य पर्वताच्या दक्षिणेकडील देशासम्बन्धाने पाणिनीच्याही पूर्वी कात्यायनाने आपल्या वार्तिकांत उल्लेख केला आहे. हा या बाबीस सबळ पुरावा होय. तसेच ख्रिस्ती शकाच्या पूर्वी तिसऱ्या शतकाच्या अशोकाच्या शिलालेखावरून जास्त पुरावा मिळतो. या लेखात राष्ट्रिक पैठेणिक अशी नावे आढळतात. पैठण येथे राहणाऱ्यांना पैठेणिक व हल्लीच्या मराठ्यांचे पूर्वज ते राष्ट्रिक होत. अशोकाच्या कुण्डे येथील शिलालेखात महाभोजाचाही उल्लेख आहे. याप्रमाणे पतंजलीच्या १०० वर्षे आधी उत्तर-दक्षिणेत दळणवळण चालू होते व महाराष्ट्रात राष्ट्रिक,महाराष्ट्रिक व भोज लोकांची राज्ये होती.(सन्दर्भ-भाण्डारकारकृत दक्षिणचा इंग्रजी इतिहास पृष्ठ ११)

तसेच हरिवंशात शेषवंशातील क्षत्रिय राजकन्येपासून झालेल्या यदूच्या ४ पुत्रांनी सह्याद्रीपासून थेट कन्याकुमारीपर्यंत ४ राज्ये स्थापिली असा उल्लेख सापडतो. त्याचप्रमाणे विदर्भ देशाचे यादव राजे सोमवंशी असून ते यदुच्या कुळात उत्पन्न झालेले आहेत असा उल्लेख हरिवंशात आढळतो. यावरून महाराष्ट्रात व वऱ्हाडात राहणारे लोक चंद्रवंशी यादव- मराठे क्षत्रिय होते हे सिद्ध होते.ख्रिस्ती सनापूर्वी ७ व्या शतकापासून इसवी सनाच्या ३ऱ्या शतकापर्यंत वऱ्हाडावर व महाराष्ट्रावर राष्ट्रे (रठ्ठे) उर्फ महाराष्ट्रे(महारठ्ठे) यांचे राज्य होते. पुढे ते अशोकाचे माण्डलिक झाले आणि पुढे स्वतन्त्र होऊन त्यांनी इसवी सनाच्या ६व्या शतकापर्यंत राज्ये केली.

मराठ्यांचे प्राचीनत्व -

श्री वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड, सर्ग ५१ श्लोक ६ यात दशरथाला महाराष्ट्रे (महारठ्ठे) विवर्धन असे म्हटले आहे.तसेच इसवी सनापूर्वी ६व्या शतकात जैन लोकांच्या "कृतांग सूत्र" या भद्रबाहूने लिहिलेल्या ग्रन्थात महाराष्ट्र शब्द आढळतो. या ग्रन्थाच्या आधाराने दुसऱ्या शामाचार्यानी लिहिलेल्या "श्री प्रज्ञापना उपांग सूत्र"यात महाराष्ट्र शब्द आढळतो. पश्चिम घाटात कार्ल्याजवळ भाजे नामक कोरीव लेणे आहे तेथील पाण्याच्या हौदावर

"महारथी साकोसिकी पुतसा! विष्णुदत्तसा देयाधमपोदी"

म्हणजे कौशिकपुत्र महारथी/महारठी/महारट्टी विष्णुदत्त याने हे बान्धले असे लिहिले आहे आणि या लेण्याचा काळ इ स पूर्व ३०० वर्षाचा आहे. मगध देशावर नन्दाचे राज्य असताना म्हणजे सुमारे २३०० वर्षांपूर्वी वररुची होऊन गेला. त्याच्या प्राकृुत प्रकाश या ग्रन्थात "शेषं महाराष्ट्रिवत्" असा उल्लेख आहे यावरून महाराष्ट्र व मराठा शब्दाचे प्राचीनत्व स्पष्ट होते.

महाराष्ट्रकुलवंशावली ग्रन्थात पुढील श्लोक आढळतो-

"सर्वेषु एक वर्णा ये कृष्यादि कर्मतत्परः ! नमस्कारेण मन्त्रेण पञ्चयज्ञा सदैवहि! एषां ज्ञाति समुद्धोतु कुलानि षण्णवत्यपि ! वंशाश्चत्वार एवात्र सू्र्यचन्द्र यदु शेषकः!!"

भावार्थ - महाराष्ट्रिक,महाराष्ट्रे उर्फ मराठे हा एक वर्ण आहे. या वर्णाचे लोक शेतकऱ्यांपासून राजापर्यंतच्या सर्व कार्यात तत्पर असतात. ते नमस्कारात्मक मन्त्राने स्वतःच पंचयज्ञ करतात.आपल्या वर्णांची विवाहादि सर्व कर्मे स्वतः करतात.त्यांच्या जातीत ९६ कुळे आणि सूर्यवंश, चन्द्रवंश, सोमवंश शेषवंश व अग्नीवंश असे चार वंश आहेत. यावरून मराठा व महाराष्ट्र शब्दाची प्राचीनता सिद्ध होते.(सन्दर्भ = क्षत्रियांचा इतिहास-भाग २ : डाॅ. के.बी. देशमुख पृष्ठ ११५ ते ११७).

यानन्तरचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे शवरभाष्य {इ.सनाचे ३रे शतक} यातील पुढील वाक्य -

" ननु जनपदपुररक्षणवृत्तिमनुपजीत्यपि क्षत्रिये राजशब्दमान्ध्राः प्रयुञ्जते "

यावर कुमारिलाने (सातवे शतक) पुढील टिप्पणी जोडली आहे,

"दाक्षिणात्यसामान्येन आन्ध्राणामिति भाष्यकारेणोक्तम् "{मध्ययुगीन भारत भाग}

शवराच्या वेळी महाराष्ट्रात आन्ध्राचे राज्य होते यामुळे शवर नुसतेच म्हणतो की,'आन्ध्रामध्ये क्षत्रियकर्म करीत नसलेले म्हणजे देश किंवा पुर यांचे रक्षण न करणारे क्षत्रियसुद्धा आपल्यास राजा असा शब्द लावतात. कुमारिलाच्या वेळी महाराष्ट्र स्वतन्त्र झाला होता,म्हणून त्याने असे लिहिले की,'दाक्षिणात्य सामान्यतः राज्य न करणारे क्षत्रिय आपल्यास राजा ही पदवी लावतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आजही ९६ कुळी मराठा राज्य नसताना देखील स्वतःस राजे म्हणवितात. ,म्हणजे शवरने ३ऱ्या शतकात व कुमारिलाने सातव्या शतकात वर्णिलेले महाराष्ट्रातील क्षत्रिय हे मराठाच होत हेच सिद्ध होते.

इतिहाससंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. a b "एक मराठा लाख मराठा people". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.
  2. ^ "India | Facts, Culture, History, Economy, & Geography". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.