मानव समाजामधील जात ही एक सामाजिक प्रणाली आहे. हिच्यामध्ये - व्यवसाय, स्व गटातील व्यक्तीशी विवाह, संस्कृती, सामाजिक वर्ग, आणि राजकीय शक्ती एकत्रित गुंतलेल्या असतात. भारतीय समाज अनेकदा "जात" शब्दाशी संबंधित आहे, असे म्हटले जाते.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


हा शब्द प्रथम पोर्तुगीजांनी त्यांच्या स्वतःच्या युरोपियन समाजात "वारसा वर्ग स्थिती"चे वर्णन करण्यासाठी वापरला होता. या शब्दाचा उगम १७व्या शतकात पोर्तुगीज casta (" वंश, जात") या शब्दातून झाला. इंग्रजीतील "जात" हा शब्द लॅटिन castus या शब्दापासून व carere या मूळ धातूपासून बनला आहे (अर्थ - वेगळा, कप्पाबंद.) युनिसेफने याला जात आधारित भेदभाव म्हटले आहे. प्रामुख्याने आशिया (भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, जपान) आणि आफ्रिका भागात ही सामाजिक व्यवस्था प्रचलित आहे.

युनिसेफच्या अंदाजानुसार जगभरातील २५ कोटी लोकांना जातिआधारित भेदभावाला तोंड द्यावे लागते.[१]

युरेशियातील जातीव्यवस्था संपादन

इंडो युरोपियन जातिव्यवस्था संपादन

इंडो युरोपीय हे युरोप, पश्चिम आशिया आणि भारतीय उपखंडामध्ये स्थायिक झाले. त्यांनी तेथील समाजाला जातिआधारित तीन हिश्श्यांत पाहिले (विभागले नाही). पुढे कदाचित त्याच जातींचे अधिक विशेषीकरण होऊन परिणामस्वरूप समाज जातींमध्ये वाटला गेला. जॉर्जेस डमझिलच्या 'क्लासिक' मांडणीनुसार मुख्यत्वे तीन जाती. एक धर्मोपदेशकासंबंधीची किंवा धार्मिकवृत्तीने व्यापलेली जात, एक योद्धा जात, आणि एक कार्यकर्ता जात. जातिव्यवस्था ही इटालिक लोकांत आणि भारतीय उपखंडात प्रस्थापित झाली. १. राजघराण्यातील लोक २. व्यापारी आणि शेतकरी ३. क्षत्रिय आणि ब्राम्हण. युरोपमध्ये ही प्रणाली तीन ऑर्डर म्हणून माहीत होती.

इंडो युरोपियन जातीचीं उदाहरणे:

  • इंडो-इराणीय - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
  • रोमन साम्राज्य - योजना, सैनिक, नागरिक
  • सेल्टिक - ड्रुडेस, एक़ुइटेस, प्लेबेस (ज्युलियस सीझर यांच्या म्हणण्यानुसार)
  • ॲंग्लो - सॅक्सन - गेबेदड्मेन, फ्यर्दमेन, वेओर्कमन (आल्फ्रेड ग्रेट यांच्या म्हणण्यानुसार)
  • स्लाव्हिक - व्होलखवस, वॉन्, क्रेसर्टयानी/ स्मेर्द् ?
  • नॉर्डिक - अर्ल, क्रुएल-रागीट माणूस, थ्रॉल-गुलाम (Lay of Rigनुसार)
  • ग्रीस (आटिका) - एउपत्रीदए, गेओमोरी, डेमीउर्गी
  • ग्रीस (स्पार्टाचा) - होमॉइओ, पेरिओएसी, हेलट्स

राजे व योद्धा हा वर्ग काही काळाने नष्ट झाला.

जातिव्यवस्थेचा अंत आणि वर्गप्रणालीद्वारे त्याची बदलण्याची शक्यता (वर्गव्यवस्था) संपादन

ब्रिटिश अमेरिका आणि फ्रान्समध्ये क्रांतीला सुरुवात झाली आणि इंडो युरोपियन संस्कृतीला आव्हान मिळाले. ज्यामुळे जातीयता नष्ट झाली आणि वर्गआधारित प्रणाली अस्तित्वात आली. पण अनेक देशांमध्ये वर्ग प्रणालीनंतर जातीयतेमध्ये तिहेरी विभागणी होताना दिसते. उदाहरणार्थ, ब्रिटन आणि जर्मनी मध्ये उच्च, मध्यम व कनिष्ट वर्ग हे द्रेएइकलास्सेन यंत्रणेमध्ये वापरलेले गेले.

भारतीय उपमहाद्वीपातील जातिव्यवस्था संपादन


भारत संपादन

प्राचीन काळापासून भारतीय समाज आदिवासी आणि व्यावसायिक गट, जाती किंवा समुदायामध्ये विभाजित आहे, त्यांना जाती म्हणतात. ऐतिहासिक काळापासून भारतीय समाजात प्रचलित असलेली "हिंदू जात प्रणाली" ही - ब्राम्हणी परंपरा आणि मध्ययुगीन काळातील सिद्धान्त यांमधून उदयाला आली.[२],

बालीमधील वर्णव्यवस्था संपादन

बालीमधील वर्णव्यवस्था भारतातील वर्णव्यवस्थेवर आधारित आहे, पण तेथील व्यवस्था सोपी आहे. बालीत चार जाती किंवा वर्ण आहेत:

बालीतील ९०% जनता या जातीत मोडते. बाली भाषेत या वर्णातील व्यक्तींना संबोधण्यासाठी वेगवेगळी संबोधने आहेत. बालीतील शूद्र इतर ठिकाणांप्रमाणे अस्पृश्य मानले गेले नाहीत. बालीतील वर्णव्यवस्था जन्मावर आधारित नाही म्हणून एकाच कुटुंबात अनेक वर्णांच्या व्यक्ती असू शकतात.

पूर्व आशिया संपादन

जपान संपादन

जपानमध्ये सामुराई व शेतकरी हे दोन मुख्य वर्ण/जाती होत्या. सामुराई ही योद्धा जात होती व फक्त त्यांना शस्त्रे बाळगण्यास मुभा होती. एखाद्या सामुराईला वाटले की कोणी शेतकरी त्याला अपमानकारक वागणूक देत आहे तर त्या शेतकऱ्याचा वध करण्याचा हक्क सामुराईला होता.

हेसुद्धा पहा संपादन

नोंदी संपादन

  • Spectres of Agrarian Territory by David Ludden December 11, 2001
  • "Early Evidence for Caste in South India," p. 467-492 in Dimensions of Social Life: Essays in honor of David G. Mandelbaum, Edited by Paul Hockings and Mouton de Gruyter, Berlin, New York, Amsterdam, 1987.

बाह्य दुवे संपादन