वैश्य हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती व्यापार व इतर अर्थव्यवस्थेशी संबंधित कामे करायची.

आधुनिक भारतात वर्णव्यवस्था नामशेष झाली नसली तरी नामशेष होण्याची आशा आहे.

जातीव्यवस्था ही पेशवे काळात जास्त प्रमाणात रूढ झाली.ह्या काळात जातीव्यवस्थेचे वर्गिकरण अलुतेदार, बलुतेदार आणि वतनदार असे होते. 
 बलुतेदार हे सुतार,लोहार,चांभार,महार,मांग,कुंभार,न्हावी,धोबी,गुरव,जोशी,भाट..
अलुतेदार हे सोनार,जंगम,शिंपी,कोळी,माळी,डवरीगोसावी,रामोशी,तेली,तांबोळी व गोंधळी इत्यादी.
ह्या लोकांकडून सामानाची देवाणघेवाण  करणारा एक व्यापारी वर्ग होता. त्या वर्गातील लोकांना वैश्यवाणी म्हणत असे 
हा वैश्यवाणी समुदाय व्यापार आणि व्यवसायासाठी वेगवेगळ्या भागात गेला.कालांतराने त्याच ठिकाणी त्यांनी आपला समुदाय निर्माण केला.त्यावरून वैश्यवाणी समाजात वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या.
ठाणे रायगड जिल्हातील लोकांना ठाणेकर वैश्य म्हणतात.

रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना संगमेश्वरी वैश्य म्हणतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना कुडाळ वैश्य म्हणतात. 

उत्तर कन्नड जिल्ह्यातील लोकांना कारवारी वैश्य म्हणतात. कोल्हापूर आणि बेळगावातील लोकांना बेळगावी वैश्य म्हणतात.

शास्त्रीय वर्ण प्रणालीतील तिसरा उच्चतम वैश्य समुदाय हा गोव्यातील कुडाली व नीसचा एकल गट आहे जो नंतर व्यापार आणि व्यवसायासाठी इतर शहरी भागात स्थायिक झाला. विशेषतः म्हापसा, फोंडा, मडगाव इथे राहणारे वैश्य पोर्तुगीज सत्ता असताना व्यापार आणि इतर कारणांनी वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरीत झाली.

कोकणस्थ वैश्य :-- या समाजाची मूळ वस्ती गोदावरी तीरी मुंगीपैठण येथे होती. दूर्गा देवीच्या दुष्काळामध्ये या समाजाची पांगापाःग होऊन निरनिराळ्या घाटांनी हे लोक कोकणात उतरले आणि तिथे स्थायिक झाले म्हणून त्यांना "कोकणस्थ वैश्य" म्हणतात.

कोकणात जे प्रमुख दोन व्यापारी वर्ग आहेत. त्यापैकी प्रस्तुत समाज हा रत्नागिरी जिल्हातील प्रभानवल्ली व संगमेश्वर ह्या दोन ठिकाणी उतरला नंतर इतर जिल्हात म्हणजे करवीर (कोल्हापूर) आणि कुलाबा (रायगड) येथे गेला. अशी माहीती वैश्य संदर्भ ग्रंथात आहे.

विजापूरच्या दरबारातून मुसलमानी अमदानीत मिळालेल्या सनदा निरनिराळ्या घराण्यांना मिळाल्या त्यांना नंतर शेट्ये हे आडनाव प्राप्त झाले. ह्या नावाने आज ही ओळखले जातात. विशालगड संस्थानापैकी वायकूळ घराण्याच्या जून्या दप्तरात अजूनही पुष्कळ सनदांची नोंद आहे.

रायगड जिल्हातील वैश्य:--- मराठी सत्तेच्या उदयापूर्वी अदिलशहा, निजामशहा, नवाब सिद्दी ह्यांची सत्ता होती. महाड माणगाव, पोलादपूर हा परीसर अदिलशहाच्या ताब्यात होता तर पश्चिम किनारपट्टी वरील मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा,रोहा ह्या भागात सिद्दीचे वर्चस्व होते जिल्हाच्या उत्तरेकडील किनारपट्टी पनवेल, उरण या भागावर इंग्रजांनी बस्तान बसविले होते.

ह्याभागातील सुपारी, नारळ, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंचा व्यापार करण्यासाठी वैश्य आले त्यांना रायगडी वैश्य असे म्हणटले जाते.

प्रामुख्याने अलीबाग, श्रीवर्धन, आदगाव, बोर्ली पंचयतन इथे वैश्यवाणी समाज जास्त आढळून येतो. ह्या भागात मापुस्कर, कोकाटे, खातू, पोवार, गांधी, देवळेकर ही आडनावे आहेत.

कालांतराने रेल्वे सुरू झाल्यावर काही व्यापारी मुंबईच्या दिशेने वाटचाल करू लागले मुंबईत आल्यावर काही लोकांनी छापखाना व पानाच्या वखारी सुरू केल्या ह्या व्यापारात ते नावारूपाला आले. देवळेकर ,हिगीष्टे ह्यांनी छानखाने काढले तर मापुस्कर, खातू ह्यांनी पान व तंबाखूच्या वखारी उत्तम प्रकारे चालविल्या. इतर लोक किराणा माल व कापड व्यवसाय करत आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण Aum.svg
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र