लोकदल
लोकदल किंवा लोक दल हा कृषी धोरणांवर आधारित भारतीय राजकीय पक्ष होता. याची स्थापना भारताचे माजी पंतप्रधान चरण सिंग यांनी केली होती.[१][२][३][४] या पक्षाची स्थापना २६ सप्टेंबर, १९७९ रोजी जनता पार्टी (सेक्युलर), सोशालिस्ट पार्टी आणि ओरिसा जनता पार्टी यांच्या विलीनीकरणातून झाली. [५] लोकदलाच्या अध्यक्षपदी चरणसिंग आणि कार्याध्यक्ष राज नारायण यांची निवड झाली. [५]
ऑगस्ट १९८२ मध्ये लोकदलामध्ये मोठी फूट पडली. चरणसिंग यांचा एक तर दुसऱ्या गटात कर्पूरी ठाकूर, मधु लिमये, बिजू पटनायक, देवी लाल, जॉर्ज फर्नांडिस, कुंभ राम आर्य यांचा समावेश होता. [६] लोकदल, जनता पक्ष आणि काँग्रेस (धर्मनिरपेक्ष) यांचे विलीनीकरण करण्यासाठी स्थापन केलेल्या समन्वय समितीतून चरणसिंग यांनी या सदस्यांना घालवून दिल्याने हे नाराज झाले होते व ते पक्षाबाहेर पडले. [७] जानेवारी १९८२ मध्ये, कर्पूरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील लोकदल जनता पक्षात विलीन झाला. [८]
२१ ऑक्टोबर १९८४ रोजी लोकदल, हेमवती नंदन बहुगुणा यांचा डेमोक्रॅटिक सोशालिस्ट पार्टी, रतुभाई अदानी यांची राष्ट्रीय काँग्रेस आणि देवी लाल यांसारख्या जनता पक्षाच्या काही नेत्यांनी एकत्र येऊन दलित मजदूर किसान पक्षाची स्थापना केली. [९] [१०] नंतर त्याचे नाव बदलून लोकदल झाले. [११]
फेब्रुवारी १९८७ मध्ये लोकदल अजित सिंह यांचा लोकदल (अ) आणि हेमवती नंदन बहुगुणा यांचा लोकदल (ब) अशा दोन गटात विभागला गेला. अजित सिंग यांनी उत्तर प्रदेश विधानसभेतील लोकदलाचे नेते मुलायमसिंग यादव यांना नेतेपदावरून घालवून दिले आणि सत्यपाल सिंह यादव यांना लोकदलाचे नेते बनवले. [१२] [१३]
मे १९८८ मध्ये अजित सिंह यांनी लोकदलाचे जनता पक्षात विलीनीकरण केले आणि ते स्वतः जनता पक्षाचे अध्यक्ष बनले. [१४]
फाटाफूट
संपादन- राष्ट्रीय लोक दल
- लोक दल (चरण)[१]
- इंडियन नॅशनल लोकदल([२])
प्रमुख सदस्य
संपादन- चरण सिंग, लोक दलाचे संस्थापक आणि भारताचे माजी पंतप्रधान. [१५]
- बिजू पटनायक, ओडिशाचे माजी मुख्यमंत्री. [१५]
- देवीलाल, भारताचे माजी उपपंतप्रधान. [१५]
- कुंभ राम आर्य . [१५]
- कर्पूरी ठाकूर . [१६] [१७]
- मधु लिमये . [१६]
- हेमवती नंदन बहुगुणा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि 1986 - 1987 दरम्यान लोक दलाचे कार्यवाहक-अध्यक्ष म्हणून काम केले [१८]
- अजित सिंग . [१४]
- सुब्रमण्यम स्वामी हे 1984-1988 दरम्यान लोकदलात होते आणि त्यांनी लोकदलाचे सरचिटणीस म्हणून काम केले होते. [१९]
- सत्य प्रकाश मालवीय हे लोकदलाचे सरचिटणीस होते. [२०]
- रामविलास पासवान हे लोकदलाचे सरचिटणीस होते. [२१]
- शरद यादव हे लोकदलाचे सरचिटणीस होते. [२२]
- मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेश विधानसभेतील लोकदलाचे नेते होते. [२३]
- सत्यपाल मलिक हे लोकदलाचे सरचिटणीस होते. [२४]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Ajay Kumar (January 31, 1986). "With Chaudhury Charan Singh in hospital, Ajit Singh likely to step in as Lok Dal chief". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-09-18 रोजी पाहिले.
- ^ Arul B. Louis Amarnath K. Menon (December 23, 2014). "Lok Dal leader Charan Singh seeks mandate for his government". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-09-18 रोजी पाहिले.
- ^ Dal (India), Lok (1980). Constitution (इंग्रजी भाषेत). Lok Dal.
- ^ Dal (India), Lok (1979). Lok Dal Election Manifesto, 1979 (इंग्रजी भाषेत). Lok Dal.
- ^ a b "September 27, 1979, forty years ago: Lok Dal formed". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-09-27. 2023-02-13 रोजी पाहिले.
- ^ "August 10, 1982, Forty Years Ago: Two Lok Dals". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-08-10. 2023-02-14 रोजी पाहिले.
- ^ "February 2, 1982, Forty Years Ago: Kerala Assembly". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-02-02. 2023-02-14 रोजी पाहिले.
- ^ "January 28, 1983, Forty Years Ago: Congress-I Shake-up". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-01-28. 2023-02-14 रोजी पाहिले.
- ^ "Formation of DMKP gives decent burial to Lok Dal-Janata merger talks". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-15 रोजी पाहिले.
- ^ "Prime Minister Rajiv Gandhi leads Congress(I) to a brute majority in eighth Lok Sabha". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-15 रोजी पाहिले.
- ^ "Sharad Yadav's revolt against Nitish Kumar: How Janata Parivar unites to split". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-15 रोजी पाहिले.
- ^ "Lok Dal splits, Devi Lal asks warring Bahuguna and Ajit Singh to work towards harmony". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-13 रोजी पाहिले.
- ^ "Lok Dal's split becomes convenient for Congress(I) in Uttar Pradesh". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-13 रोजी पाहिले.
- ^ a b "Ajit Singh catapulted as Janata Party president". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-13 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ a b c d "April 9, 1982, Forty Years Ago: Lok Dal Split". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-04-09. 2023-02-13 रोजी पाहिले.
- ^ a b "Lok Dal splits, turns out to be biggest blow to the Opposition". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-13 रोजी पाहिले.
- ^ SINGH, JAGPAL (2015). "Karpoori Thakur: A Socialist Leader in the Hindi Belt". Economic and Political Weekly. 50 (3): 54–60. ISSN 0012-9976.
- ^ "Split in Lok Dal avoided as warring factions call a hasty truce in New Delhi". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-13 रोजी पाहिले.
- ^ Nandy, Pritish (15 May 1988). "The Usurpers". The Illustrated Weekly of India. p. 1294.
- ^ ""There are no camps in Lok Dal" : S P Malviya". The Illustrated Weekly of India. 1 March 1987. p. 464.
- ^ "With Chaudhury Charan Singh in hospital, Ajit Singh likely to step in as Lok Dal chief". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-14 रोजी पाहिले.
- ^ "Prospect of Lok Dal-Janata Party alliance may spell trouble for Congress(I) in LS polls". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-14 रोजी पाहिले.
- ^ "Mulayam Singh Yadav, a mass leader who played politics like a wrestler". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-14 रोजी पाहिले.
- ^ "Charan Singh expels Devi Lal from Lok Dal". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-14 रोजी पाहिले.