जॉर्ज फर्नांडिस

भारतीय राजकारणी
George Fernandes (es); George Fernandes (hu); George Fernandes (ast); Джордж Фернандес (ru); जॉर्ज फर्नान्डिस (mai); George Fernandes (ga); جورج فرناندز (fa); 喬治·費爾南德斯 (zh); George Fernandes (dag); George Fernandes (tr); جارج فرنانڈیز (ur); George Fernandes (sv); ג'ורג' פרננדס (he); जार्ज् फर्नान्डिस् (sa); जॉर्ज फ़र्नान्डिस (hi); జార్జ్ ఫెర్నాండెస్ (te); George Fernandes (fi); জৰ্জ ফাৰ্নাণ্ডেজ (as); George Fernandes (cs); ஜார்ஜ் பெர்னாண்டஸ் (ta); জর্জ ফার্নান্ডেজ (bn); George Fernandes (fr); ജോർജ് ഫെർണാണ്ടസ് (ml); George Fernandes (sk); George Fernandes (yo); George Fernandes (de); ଜର୍ଜ ଫର୍ଣ୍ଣାଣ୍ଡେସ (or); जॉर्ज फर्नान्डिस (mr); George Fernandes (pl); George Fernandes (af); George Fernandes (sq); George Fernandes (sl); George Fernandes (pt); George Fernandes (pt-br); George Fernandes (ca); George Fernandes (id); George Fernandes (nn); George Fernandes (nb); George Fernandes (nl); ジョージ・フェルナンデス (ja); جورج فرناندس (arz); ಜಾರ್ಜ್ ಫರ್ನಾಂಡಿಸ್ (kn); جارج فرنانڈیز (pnb); George Fernandes (en); جورج فرناندس (ar); George Fernandes (da); Джордж Фернандес (uk) político indio (es); indiai politikus (hu); politikari indiarra (eu); políticu indiu (ast); polític indi (ca); Indischer Politiker (de); polaiteoir Indiach (ga); سیاست‌مدار هندی (fa); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politician indian (ro); indisk politiker (sv); פוליטיקאי הודי (he); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); భారతీయ రాజకీయ నాయకుడు (te); intialainen poliitikko (fi); Indian politician (en-ca); indický politik (cs); இந்திய முன்னாள் அரசியல்வாதி (ta); politico indiano (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); homme politique indien (fr); India poliitik (et); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); político indiano (pt); Indiese politikus (af); Indian politician (en-gb); indisk politiker (nb); भारतीय राजकारणी (mr); político indio (gl); indisk politikar (nn); ഇന്ത്യയിലെ പ്രമുഖ സോഷ്യലിസ്റ്റ് നേതാവ്, മുൻ കേന്ദ്ര പ്രതിരോധ മന്ത്രി (ml); Indiaas politicus (nl); hinduski polityk (pl); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); индийский политик (ru); індійський політик (uk); Indian trade unionist and politician (1930–2019) (en); سياسي هندي (ar); politikan indian (sq); indisk politiker (da) George Mathew Fernandes (es); フェルナンデス国防大臣代行 (ja); ജോർജ്ജ് ഫെർണാണ്ടസ്, George Fernandes (ml); Фернандес, Джордж (ru); जॉर्ज फर्नांडीस, जॉर्ज फर्नांडिस (mr); George Matthew Fernandes (de); ଜର୍ଜ ଫର୍ଣ୍ଣାଣ୍ଡେଜ (or); George Mathew Fernandes (pt); ஜார்ஜ் பெர்னான்டஸ், சார்ச்சு பெர்னான்டசு (ta)

जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस (३ जून १९३०- २९ जानेवारी २०१९): कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षातील एक ज्येष्ठ होते. याशिवाय त्यांनी १९९४ साली नितीश कुमार ह्यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली होती. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. त्यांचा मृत्यू २९ जानेवारी २०१९ रोजी ८८ व्या वर्षी झाला.[१]

जॉर्ज फर्नान्डिस 
भारतीय राजकारणी
جورج فرناندس سنة 2002
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावजॉर्ज फ़र्नान्डिस
जन्म तारीखजून ३, इ.स. १९३०
मंगळूर
मृत्यू तारीखजानेवारी २९, इ.स. २०१९
नवी दिल्ली
मृत्युचे कारण
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • St. Aloysius College
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
पुरस्कार
  • Padma Vibhushan in Public Affairs (इ.स. २०२०)
स्वाक्षरी
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुरुवातीचे आयुष्य

संपादन

जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३०ला जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक वृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील एका खाजगी विमा कंपनीत अधिकारी होते. सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती. १९४९ मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेथे त्यांचे सुरुवातीचे दिवस अत्यंत खडतर गेले. पुढे कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले, त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला

राजकीय कारकीर्द

संपादन

जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम इ.स. १९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का.पाटिल यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी इ.स. १९७४ मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. इ.स. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम बघितले. जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहीर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला. इ.स. १९८४च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.पण इ.स. १९८९ मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या ति किटावर लोकसभेवर निवडून गेले.विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.

इ.स. १९९४ मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला.पुढे इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला. इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात आला.

इ.स. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले. इ.स. २००१ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २००१ मंत्रिमंडळाबाहेर होते.पण ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली.

इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहार राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या मुझफ्फरपूर मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रीय राहिले नाहीत.त्यांना इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) पक्षाने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षनेतृत्वाबरोबरचे त्यांचे मतभेद मिटले आणि ते राज्यसभेत पक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले आहेत.

पुरस्कार

संपादन

इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[२]

संदर्भ

संपादन
  1. ^ "कामगार नेते व माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन". लोकमत. २९ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. 2021-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.